"China made, blisters on the road!" Anil Rathore hit the mobile on the road as soon as he got the information | Sarkarnama

`चायना मेड, रस्त्यावर फोड !` ती माहिती मिळताच अनिल राठोड यांनी रस्त्यावर आपटले मोबाईल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 जून 2020

चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी करून त्यांनी चीनचा निषेध केला. यापुढे कोणीही चिनी बनावटीच्या वस्तु वापरू नये, असे आवाहन करीत त्यांनी आज चिनी बनावटीचे मोबाईल रस्त्यावर आपटून फोडले.

नगर : चीन-भारत सीमारेषेवर दोन्ही सैन्याच्या चकमकीत आज भारतीय जवानांच्या हुतात्म्याची बातमी ऐकताच शिवसेनेेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड चिडले. लगेचच चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी करून त्यांनी चीनचा निषेध केला. यापुढे कोणीही चिनी बनावटीच्या वस्तु वापरू नये, असे आवाहन करीत त्यांनी आज चिनी बनावटीचे मोबाईल रस्त्यावर आपटून फोडले.

चीनने सीमेवर भारताशी कुरबुरी सुरू केली आहे. काल सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे काही जवान शहीद झाले. चीनने जागतिक महासत्ता होण्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्याचाच भाग म्हणून त्यांनी भारताला डिवचले आहे. त्यामुळे भविष्यात चीन हा भारताचा शत्रू होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक चिडले आहेत.

काल या संघर्षाच्या बातम्या धडकत असताना राठोड अस्वस्थ झाले. आज त्यांनी आंदोलन पुकारले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीगेटजवळ आंदोलन पुकारत चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी केली. राठोड यांनी चिनी बनावटीचे मोबाईल रस्त्यावर धडाधड आदळून फोडून टाकले. यापुढे कोणीही चिनी बनावटीच्या वस्तु वापरू नये, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापाैर अभिषेक कळमकर, विक्रम राठोड तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी चिनच्या विरोधात घोषणा देत यापुढे चिनचा कोणताही माल वापरणार नाही, असा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांची त्यांच्याजवळी मोबाईल बदलून भारतीय बनावटीचे मोबाईल वापरण्याचा निर्णय घेतला. आपण व आपल्या जवळील सहकाऱ्यांनाही भारतीय बनावटीच्या वस्तु वापरण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.

चीनहा हा भ्याड हल्ला : राठोड

चिन - भारतादरम्यान झालेला संघर्ष, चिनचा हा भ्याड हल्ला आम्ही सहन करणार नाही. ही अत्यंत भय आणि चिंता निर्माण करणारी घटना आहे. आपले 20 जवान शहीद झाले. ज्या जवानांमुळे आपलं कुटुंब सुरक्षित आहे. देश सुरक्षित आहे. त्या जवानांवर अशी वेळ येते. याचा बदला घेतलाच पाहिजे. आपले 20 मारले चिनचे 20 हजार मारले पाहिजे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने या घटनेचा निषेध करीत आहोत. यापुढे नागरिकांनी चिनचा कोणताही माल वापरू नये. आपल्या कुटुंबाला सांगून चिनच्या मालाची होळी करा, असे आवाहन अऩिल राठोड यांनी या वेळी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख