मुलांचं नुकसान होतंय, मराठा आरक्षणाचं आताच बोला : छत्रपती संभाजीराजे - Children are being harmed, talk about Maratha reservation now: Chhatrapati Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

मुलांचं नुकसान होतंय, मराठा आरक्षणाचं आताच बोला : छत्रपती संभाजीराजे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द केल्याबाबत संभाजीराजे यांनी स्पष्ट भूमिका केली. 

पुणे : मराठा आरक्षणाबाबत चालढकल होता कामा नये. 102 च्या घटनादुरुस्तीबाबत समिती नेमलेली आहे. त्यांनी अहवाल तातडीने द्यावा. समाजातील मुलांचे मोठे नुकसान होत आहे. काय निकाल लावायचा ते आताच लावा, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी येथे माध्यमांशी बोलताना मांडले.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रदद्द केल्याबाबत ते बोलत होते. ते म्हणाले की मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शाहु महाराजांची भूमिका मांडली आहे. 2013 ला माझ्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढला. त्या वेळी मिळालेले आरक्षण टिकले नाही. त्यानंतर 50 लाख लोकांना पटवून सांगितले, की काहीतरी गालबोट लागू शकते. झाले तसेच. सरकारने जी भूमिका घेतली, ती विचार करायला लावणारी आहे.  न्यायाधिशांनी जी स्थगिती दिला, त्या वेळी सरकारला वाटले, की वकिलांच्या माध्यमातून मागणी करू. परंतु तसे झाले नाही.

हेही वाचा... प्रशांत गायकवाड यांनी केली ही घोषणा

संभाजीराजे म्हणाले की वारंवार सरकारची भूमिका बदलत आली आहे. परवा 50 टक्के आरक्षणाच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही, असे सांगितले होते. 11 पेक्षा जास्त राज्यात 50 पेक्षा जास्त आरक्षण आहे. आपण दुसऱ्या राज्याचे म्हणणे ऐकून घेऊ. एका अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे, की विशेष बाब म्हणून तुम्ही आरक्षण देऊ शकता, असे म्हटले होते. परंतु विशेष बाब कशी सिद्ध करणार?

गायकवाड अहवालाचे पूर्ण भाषांतर झाले आहे का. जेवढे पाहिजे तेवढे घेतले, म्हणजे हे कोण ठरविणार. मराठा समाजाच्या वतीने आणि मागासवर्गीय आयोग नेमला होता, त्यासाठी दोन वरिष्ठ वकिल देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा... पिक विम्याबाबत मोठी घोषणा

102 ची घटना दुरुस्ती 

102 ची घटना दुरुस्तीचा विषय महत्त्वाचा आहे. राज्यसभेत एक समिती नेमलेली आहे. त्यामध्ये 25 खासदार आहेत. त्यात चार महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी अहवालामध्ये 12 नंबरच्या मुद्द्याचा अभ्यास करावा. जे मागासवर्गीय अहवाल तयार केला जातो. त्यातून राज्याचा अधिकार काढून घेतला जाणार नाही. विषय ईकडे-तिकडे नेऊ नका. केंद्र सरकारने एक शपथपत्र द्वावे. सोमवारी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याशी मिटिंग होणार आहे. सामाजिक मागास कायदा बारीक झाला. तो कोणी केला. आपण गल्लीतल्या भांडणासारखे भांडत बसलो आहोत. माझी मुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांना विनंती आहे, की एकमताने जसा कायदा पारित केला, तशीच येणारी सुनावनीच्या वेळी एकत्र राहू. जो काही निकाल लावायचा, तो याच वेळी लावा. मराठा समाजातील मुलांचे मोठे नुकसान होत आहे. सत्तेत असतील, किंवा नसतील त्यांनीही या विषयाला पाठिंबा दिला पाहजे. माझं-तुझं म्हणण्यापेक्षा या प्रकाराचा निकाल लावा, हीच मागणी आहे.
 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख