नगरमध्ये 'चेस दी व्हायरस' गतिमान, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - 'Chase the virus' in motion in the town, Collector's instructions | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये 'चेस दी व्हायरस' गतिमान, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

मागील चोवीस तासांत 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, आता एकूण मृत्यूची संख्या 349 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४ हजार २०३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

नगरमध्ये 'चेस दी व्हायरस' गतिमान, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नगर : 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे. मात्र, त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळेच महानगरपालिका क्षेत्र आणि प्रत्येक तालुक्यात अधिकाधिक चाचण्या घेऊन रुग्णांपर्यंत पोहोचावे आणि संसर्गाची साखळी तुटावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा. आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, आज जिल्ह्यात ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २० हजार ५१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७४ टक्के इतके झाले आहे, तर काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३४४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २८२, अँटीजेन चाचणीत ३२२ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६३ रुग्ण बाधीत आढळले.

सध्या जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 510 झाली असून, सध्या 3 हजार 344 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील चोवीस तासांत 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, आता एकूण मृत्यूची संख्या 349 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४ हजार २०३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख