गायकरांच्या पक्षबदलामुळे पिचड खचले नाहीत, उलट म्हणाले, आता तरुणांना संधी - The change of party of the singers did not cost the pitcher, on the contrary, now the opportunity for the youth | Politics Marathi News - Sarkarnama

गायकरांच्या पक्षबदलामुळे पिचड खचले नाहीत, उलट म्हणाले, आता तरुणांना संधी

शांताराम काळे
सोमवार, 15 मार्च 2021

मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असून, आणखी ताकदीने उभे राहण्याचा संकल्प कार्यकर्ते, मित्रांनी करावा,' असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.

अकोले : "तालुक्‍यातील हालचालींमुळे कोणीही विचलित होऊ नये. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असून, आणखी ताकदीने उभे राहण्याचा संकल्प कार्यकर्ते, मित्रांनी करावा,' असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले. 

जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह त्यांचे समर्थक उद्या (मंगळवारी) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून कार्यकर्त्यांना आवाहन करताना पिचड यांनी म्हटले आहे, की राजकारणात चढ-उतार सुरू असतात. या गोष्टींना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कधीही जास्त महत्त्व दिले नाही. मीही त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय. तालुक्‍यातील राजकीय बदलामुळे तरुणांना सुवर्णसंधी आहे.

हेही वाचा... आमचं मस्तच चाललंय

कुठलाही नेता फक्त जिवाभावाच्या कार्यकर्त्यांमुळे मोठा असतो. या बदलांमुळे मी खचलोय, असा विचार मनात आणू नका. आपले कार्य पूर्ण ताकदीने सुरू ठेवा. मी खंबीरपणे आपल्यासोबत असल्याचे पिचड यांनी नमूद केले आहे. 

हेही वाचा...

त्या नुकसानीची पिचड यांच्याकडून पाहणी

अकोले : येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळेला आकस्मिक लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

झालेली घटना दुर्दैवी असून, झालेले नुकसान भरुन काढून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी व कार्यकारिणी सदस्य यांनी जे परिश्रम घेतले, ते कौतुकास्पद आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा... आम्ही निधी मंजूर केला

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यादृष्टीने दुर्दैवी घटनेला तोंड देऊन आवश्यक ती मदत उभी करु, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईल, असेही पिचड या वेळी म्हणाले.

शिक्षणासारख्या पवित्र व चांगल्या कामात राजकारण आणू नये, ही संस्था तालुक्याची असून, संस्थेचे सभासदच कार्यकारिणी सदस्य होऊन संस्थेचा कारभार चांगल्या पद्धतीने पाहतात, अशी भावना माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली.

घटनेप्रसंगी प्रसंगावधान राखून कार्यरत असणार्‍या प्राचार्य व कर्मचार्‍यांचेही त्यांनी कौतुक केले. संगणक कक्ष उभारणीसाठी अनेक हात पुढे येत आहे, त्यांचे पिचड यांनी संस्थेच्यावतीने स्वागत केले. 

संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे पाटील यांनी पर्यायी संगणक प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात आली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत संगणक प्रयोग शाळेचे एक एप्रिल रोजी उदघाटन करणार असल्याचे सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख