केंद्र सरकारनं घेतलंय झोपेचं सोंग : बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारपर्यंत या समाजघटकांचा आवाज नक्कीच पोचला असून, झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आता तरी जागे होऊन या घटकांना मदत करावी.
thorat
thorat

संगमनेर : ""कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या सर्व स्तरांतील घटकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यासाठी, कॉंग्रेसने देशपातळीवर चालवलेल्या "स्पीक अप इंडिया' या ऑनलाइन मोहिमेला आज महाराष्ट्रातही उदंड प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारपर्यंत या समाजघटकांचा आवाज नक्कीच पोचला असून, झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आता तरी जागे होऊन या घटकांना मदत करावी,'' अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली. 

कॉंग्रेसतर्फे आज सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत ऑनलाइन मोहीम चालवली. त्यात राज्यातील मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, पक्ष पदाधिकारी, जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने ट्‌विटर, फेसबुक, यू-ट्यूब, इन्स्टाग्रामवरून भाग घेतला. गरिबांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करावेत व पुढील सहा महिने प्रतिमहा साडेसात हजार रुपये द्यावेत, स्थलांतरित मजुरांना सुखरूप घरी पोचवण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी, तसेच मनरेगातर्फे 200 दिवसांचा रोजगार द्यावा या मागण्या या माध्यमातून केल्या, अशी माहिती थोरात यांनी दिली. 

कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाउनमुळे सर्व स्तरांतील घटकांना केंद्राकडून सढळ मदतीची व आधाराची गरज असताना त्याकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. म्हणूनच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी कॉंग्रेसने ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली. सामान्य जनतेचा हा आवाज केंद्र सरकारचे कान नक्की उघडेल, अशी आशा थोरात यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा...

विनामास्कच्या लोकांमुळे कर्मचारी धास्तावले 

नगर : कोरोनामुळे जिल्हा परिषदेत 33 टक्के उपस्थिती ठेवण्यात आली होती. ती आता 100 टक्के करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेत येऊन कामकाज करू लागले आहेत. मात्र, अभ्यागतांची वर्दळ वाढली आहे. त्यातील काही जण मास्क न वापरताच कर्मचाऱ्यांच्या टेबलजवळ येऊन त्यांचे कामकाज करून घेत असल्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत. या लोकांना रोखा अशी मागणी होऊ लागली आहे. 

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेने हॅंडवॉशची सोय केली आहे. थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. प्रत्येकाला मास्क वापरण्याबाबत सूचना केली आहे. मात्र, अनेक जण जिल्हा परिषदेत प्रवेश करेपर्यंत मास्कचा वापर करतात आणि त्यानंतर मास्क काढून विविध विभागात फिरत आहेत. काही जण आपल्या फाइल मंजूर करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या जवळ खुर्ची टाकून विनामास्क बसतात. अशा व्यक्तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असून, त्याचा सर्वांनी धसका घेतला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला व संघटनांकडे आपली व्यथा मांडून त्याकडे लक्ष वेधले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com