A boy told about the immoral relationship of a municipal officer | Sarkarnama

मनपा अधिकाऱ्याच्या अनैतिक संबंधाचे बिंग `तिच्या` मुलाने फोडले

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

याबाबत संबंधित मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ, कार्यकारी बाळू घाटविसावे व अजून एक संशयित महिलेच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नगर : एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना आरोग्य अधिकारी मात्र अनैतिक संबंधाच्या प्रकारणात गुल खेळत आहेत. काल वैद्यकीय अधिकाऱ्याचेच एका महापालिकेत कर्मचारी असलेल्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा भांडाफोड झाला. तिच्या 14 वर्षीय मुलाच्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

याबाबत संबंधित मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ, कार्यकारी बाळू घाटविसावे व अजून एक संशयित महिलेच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घडले हे कारण...

मुलाने फिर्य़ादित म्हटले आहे, की ता. 13 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता घरातून मोठ्याने आवाज ऐकू येत होते. त्यामुळे मी जागा झालो. त्याचवेळी डाॅ. बोरगे, मिसाळ व आई खुर्चीवर बसले होते. घाटविसावे हाही तेथेच होता. दारुच्या चार बाटल्या आणि मटणाच्या जेवणाची चार ताटे लावली होती. तुम्ही इथे काय करता असे विचारले असताना डाॅ. बोरगे याने बूट काढून मारला. त्यामुळे मी गच्चीवर जावून बसलो असता तेथेही चाैघे आले आणि शंकर मिसाळ याने मला धक्काबुक्की केली. तसेच डाॅ. बोरगे व मिसाळ यांनी जीवे मारण्याची धमकी देत गच्चीवरून ढकलून देण्याचा प्रय़त्न केला. एका अधिकाऱ्याचे आईशी अनैतिक संबंध असल्याने तीही विरोध करीत नव्हती. मी विरोध केला असता मला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी संबंधित लोकांनी दिली. तसेच यापूर्वीही या लोकांनी माझ्या हाताला शिगारेटचे चटके दिलले असल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.

निलंबनाची कारवाई शक्य

दरम्यान, महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत चर्चा होणार आहे. एकीकडे महापालिकेने स्वच्छतेबाबत देशपातळीवर पारितोषिक मिळविले असताना दुसरीकडे आरोग्य अधिकाऱ्यांचेच प्रकरण उघडकीस आल्याने महापालिकेची बदनामी झाली आहे. त्याबाबत कारवाई करण्यासाठी आज होणाऱ्या बैठकित निर्णय होणार आहे.  

कोरोनाचे संकट अन यांचे हे काय चालले

दरम्यान, नगर शहरात कोरोनाचे मोठे संकट आहे. प्रत्येक भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. इथे अधिकारी मात्र गुल खेळत आहेत. रात्रीच्या पार्ट्या झोडत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या प्रश्नांकडे काय लक्ष देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य आबादित ठेवण्याची जबाबदारी आरोग्य अधिकाऱ्यांची आहे. तथापि, कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी नवीन उपाययोजना आखण्याची गरज आहे. तसे न होता अधिकारी अशा प्रकरणात अडकत असतील, तर नागरिकांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे संघटना, राजकीय नेते, जिल्हा प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी जीवाचे रान करीत असताना, हे अधिकारी मजा करीत फिरत आहे, हे निषेधार्ह आहे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख