संबंधित लेख


शिर्डी : साईदर्शनासाठी भाविकांनी सभ्य पोषाखात यावे, असा मजकूर असलेल्या साईसंस्थानच्या विनंती फलकावर आज भूमाता ब्रिगेडच्या समर्थकांनी काळा रंग फेकून...
गुरुवार, 7 जानेवारी 2021
जगाचे लक्ष असलेल्या येथील साईबाबांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बाॅंब असल्याची खबर मिळाली. प्रशासनाची पळापळ झाली. अग्निशमन दलाचे बंब वेळेत आले. शिघ्र कृती दलानेही चपळाई केली.
शिर्डी : जगाचे लक्ष असलेल्या येथील साईबाबांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बाॅंब असल्याची खबर मिळाली. प्रशासनाची पळापळ झाली. अग्निशमन दलाचे बंब वेळेत आले. शिघ्र कृती दलानेही चपळाई केली. ती बाॅम्बसदृश वस्तू श्वानपथकाने अचूक शोधली. निकामी केली. नागरिकही घाबरून गेले. पण नंतर ती सामूहिक रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट झाले.
शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराकडे जगाचे लक्ष असते. जगभरातून पर्यटक, भाविक येथे आवर्जुन येतात. रोज लाखोंची गर्दी, मोठ्या प्रमाणात होणारे अन्नदान हे येथील वैशिष्टये. रोजच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे येथील हाॅटेल व्यावसाय तेजीत आहे. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद आहेत. असे असली, तरी मंदिराची सुरक्षेबाबत सर्वजण सज्ज आहेत की नाही, हाही महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच ही रंगीत तालीम करून प्रशासनाने सर्व काही अलबेल असल्याचे सिद्ध केले.
काल सकाळी सव्वाआठच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एकापाठोपाठ एक विविध विभागांना साईमंदिर परिसरात चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब असल्याची सूचना दिली. अवघ्या सात मिनिटांत नगरपंचायतीचा अग्निशमन बंब तेथे दाखल झाला. शीघ्र कृती दलाने शोधमोहीम सुरू केली. एका पथकाने यंत्रांच्या साह्याने स्फोटकांचा शोध सुरू केला. श्वानपथक अचूकपणे स्फोटके लपवून ठेवलेल्या ठिकाणी पोचले. यंत्राद्वारे सिग्नल मिळू लागले. काही वेळातच ही स्फोटके जागेवरच निकामी करण्यात आली.
ती रंगीत तालीम
साईमंदिर परिसरात एरव्ही भाविकांची मोठी गर्दी असते. गर्दी असताना बॉम्ब ठेवून घातपाताचा प्रयत्न झाल्यास तातडीने हालचाल करून स्फोटके निकामी कशी करायची, त्यासाठी विविध विभागांनी सामूहिक हालचाली कशा करायच्या, याची रंगीत तालीम करण्यात आली, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचाैरे यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale