भाजपची नगर उत्तर जिल्हा कार्यकारिणी जाहीर ! विखे पाटील निमंत्रित सदस्य  - BJP's North District Executive announced! Vikhe Patil Invited Member | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

भाजपची नगर उत्तर जिल्हा कार्यकारिणी जाहीर ! विखे पाटील निमंत्रित सदस्य 

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

भारतीय जनता पक्षाच्या नगर उत्तर जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी जाहीर केली.

शिर्डी : भारतीय जनता पक्षाच्या नगर उत्तर जिल्ह्याची जंबो कार्यकारिणी आज जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी जाहीर केली. 

ते म्हणाले, ""भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्यपदी श्‍याम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, ऍड. रवीकाका बोरावके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, हेरंब औटी, उदयसिंह चंदेल, विठ्ठल लंघे, राजेश चौधरी व राहात्याच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.'' 

पक्षाची नूतन कार्यकारिणी अशी : शरद थोरात (कोपरगाव), ऍड. रघुनाथ बोठे (राहाता), अशोक पवार (शिर्डी), नितीन कापसे (राहाता), सुधाकर गुंजाळ (संगमनेर), गणेश राठी (संगमनेर), सतीश सौदागर (श्रीरामपूर), सचिन देसरडा (नेवासे), सुदाम सानप (संगमनेर) या सर्वांची उपाध्यक्षपदी, तर नितीन दिनकर (नेवासे), जालिंदर वाकचौरे (अकोले), सुनील वाणी (श्रीरामपूर) यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. महिला, युवा, अनुसूचित जाती, आदिवासी, अल्पसंख्याक, किसान व इतर मागासवर्गीय मोर्चाच्या अध्यक्षपदी अनुक्रमे सोनाली नाईकवाडे (संगमनेर), श्रीराज डेरे (संगमनेर), विनोद राक्षे (कोपरगाव), विजय भांगरे (अकोले), असिफखान पठाण (संगमनेर), सतीश कानवडे (संगमनेर), बाळासाहेब गाडेकर (राहाता) यांची नियुक्ती करण्यात आली. 

शहराध्यक्ष : दत्तात्रय काले (कोपरगाव), ऍड. श्रीराम गणपुले (संगमनेर), ज्ञानेश्वर गोंदकर (राहाता), सचिन शिंदे (शिर्डी), मारुती बिंगले (श्रीरामपूर), बबन मुठे (श्रीरामपूर). 

नव्या - जुन्यांचा मेळ साधला : गोंदकर

जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर म्हणाले, ""जिल्हा कार्यकारिणी सदस्य व नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना समतोल साधण्यात आला. पक्षाचे काम करण्यासाठी वेळ देऊ शकणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. नव्या-जुन्यांचा मेळ साधण्यात आला आहे. पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.'' 
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख