राज्यात भाजपाची पिछेहाट ! प्रदेशाध्यक्षांना स्वतःचे गावही राखता आले नाही : थोरात - BJP's backwardness in the state! The state president could not even keep his own village: Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात भाजपाची पिछेहाट ! प्रदेशाध्यक्षांना स्वतःचे गावही राखता आले नाही : थोरात

आनंद गायकवाड
सोमवार, 18 जानेवारी 2021

राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल पाहता, जवळपास 80 टक्के जागा महाविकास आघाडीने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल. याचा अर्थ आमच्या वर्षभरातील कामावर लोक समाधानी असल्याची प्रतिक्रीया राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

संगमनेर : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल पाहता, जवळपास 80 टक्के जागा महाविकास आघाडीने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल. याचा अर्थ आमच्या वर्षभरातील कामावर लोक समाधानी असल्याची प्रतिक्रीया राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

आज ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर संगमनेरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता, कोल्हापूर, नंदूरबार, नागपूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वासीम, बुलढाणा आदींसह 13 जिल्ह्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, विदर्भात 50 टक्के जागांवर आम्हाला निर्विवाद यश मिळाले आहे. मराठवाड्यातही मोठे यश मिळण्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे 4 ते साडेचार हजार ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता असून, राज्यात भाजपाची पिछेहाट झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना खानापूरची व माजी प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावाची जागा राखता न आल्याची टीका करताना भाजपाची मंडळी खोटे बोलण्यात पटाईत असल्याची टीका त्यांनी केली. हा विजय महाविकास आघाडीच्या कामावर जनता समाधानी असल्याचे प्रतिक आहे.

जिल्हा बँक सहकार व शेतकऱ्यांच्या विकासाची कामधेनू आहे. त्यांच्या विकासात बँकेचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या विकासात या बँकेचा मोठा वाटा आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राजकारण न आणता, बँक चांगल्या पध्दतीने चालवणाऱ्या, शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या समविचारी लोकांना एकत्र घेवून निर्णय घेणार आहोत.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख