राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार ! विखे पाटील यांना विश्वास - BJP will come to power in the state soon! Trust Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार ! विखे पाटील यांना विश्वास

मुरलीधर कराळे
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे आहे. इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतून जनतेचे पाठबळ भाजपाच्या पाठिशी असल्याचे सिध्द झाले आहे.

नगर : बिहार निवडणुकीच्या यशानंतर भाजपमधील सर्वाची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेवून आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचवा. राज्यात लवकरच सत्ता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटीबध्द व्हा, असा संदेश भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

शिर्डी शहरातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियक्ती पत्र आमदार विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, पक्षाच्या उद्योग आघाडीच्या उतर महाराष्ट्राचे प्रमुख शिवाजी गोंदकर, शहराचे अध्यक्ष सचिन शिंदे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन आदी या वेळी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे आहे. इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतून जनतेचे पाठबळ भाजपाच्या पाठिशी असल्याचे सिध्द झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे आपण पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे.

कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे जगाचे लक्ष वेधले गेले, केलेल्या यशस्वी उपाय योजनांमुळे भारतात मृत्यूचा दर कमी राहिला. देशवासीयांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून पथविक्रेते आणि उद्योजकांपर्यत सर्वानाच उभारी देण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसांपर्यत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिर्डी नगरपंचायतीत भाजपचाच झेंडा फडकेल

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. अनेक महिने घरात बसलेले मुख्यमंत्री राज्याने कधी पाहिले नव्हते. शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. समाजातील कोणत्याच घटकांना आघाडी सरकार दिलासा देवू शकले नाही. महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेला सांगावे लागेल. आगामी काळात नगरपंचायतीची असलेली निवडणूक लक्षात घेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू करावे, थोड्याच दिवसात राज्यात सता येईल आणि नगरपंचायतीवरही भाजपा झेंडा फडकेल, असे सुतोवाचही विखे पाटील यांनी केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख