जामखेडमध्ये भाजपला धक्का ! तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार - BJP pushed in Jamkhed! Three corporators will go to NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

जामखेडमध्ये भाजपला धक्का ! तीन नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार

वसंत सानप
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह आकरा नगरसेवकांनी तीन महिण्यांपूर्वी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आपले नगराध्यक्षपद कायम ठेवण्यात यश मिळविले होते.

जामखेड : जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्ययमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह तिघा नगरसेवकांनी भाजपला व माजी मंत्री राम शिंदे यांना जय महाराष्ट्र करीत आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. हा पक्ष प्रवेश आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत होणार असल्याचे महेश निमोणकर यांनी सांगितले.

या वेळी प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे, अमित जाधव, राजेश वाव्हळ, मोहन पवार हे उपस्थितीत होते.

जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह आकरा नगरसेवकांनी तीन महिण्यांपूर्वी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आपले नगराध्यक्षपद कायम ठेवण्यात यश मिळविले होते.

या वेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह राजश्री मोहन पवार, विद्या राजेश वाव्हळ या नगरसेवकांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. यामध्ये निमोणकर व पवार हे दोघे अपक्ष, तर वाव्हळ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले होते. या तिघांनी माजी मंत्री राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. आता मात्र या तिघांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे महेश निमोणकर, राजेश वाव्हळ व मोहन पवार हे तिघेही चांगले मित्र आहेत. तिघांचाही जनसंपर्क मोठा आहे. महेश निमोणकर यांचे तरुण मंडळाच्या माध्यमातून शहरात मोठे नेटवर्क आहे. तर मोहन पवार हे कुस्ती क्षेत्रात नावाजलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांची स्वतः ची तालीम असून, तालुक्यातील अनेक नामावंत पहिलवान त्यांनी घडविले आहेत. राजेश वाव्हळ हे शांत संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जातात. हे तिघे नेहमी ऐकमेका बरोबर असतात. या तिघा मित्रांनी पक्षांतराचा निर्णय ही ऐकाच वेळी घेतला, हे मात्र लक्षवेधी ठरले आहे. 

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपूर्वी अकरा नगरसेवकांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून भाजपाच्या ताब्यात असलेली जामखेड नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दिली होती. नगरपालिकेचा कार्यकाळ अवघ्या तीन महिण्यांचा राहिलेला असून, ता.१० जानेवारीला नगरपालिकेच्या नगरसेवकांना पाच वर्षे मुदत पूर्ण होत असताना अखेरच्या टप्यात होत असलेले पक्षांतर भाजपसाठी मोठा हदरा मानला जातो आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख