भाजपनेते वैभव पिचड यांना धक्का, मधुकर नवले यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश - BJP leader Vaibhav Pichad pushed, Madhukar Navale joins Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

भाजपनेते वैभव पिचड यांना धक्का, मधुकर नवले यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश

शांताराम काळे
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचे समर्थक मधुकर नवले यांनीही काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पिचड यांना धक्का मानला जातो.

अकोले : तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची भूमिका निभावणारे 2016 पासून काँग्रेस पक्षापासून दूर झालेले ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले अखेर कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले. ते भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचे समर्थक होते. त्यामुळे ऐन ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पिचड यांना धक्का मानला जातो.

नुकताच मुंबई येथे गांधी भवनात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्षपद, अगस्ती एज्युकेशनचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेले मीनानाथ पांडे, एकवीस वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून तसेच विविध शेतकरी संघटनेत विशेष योगदान असलेले रमेश जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे राज्य सचिव व आदिवासी युवकांचे नेतृत्व करणारे मदन पथवे, भास्करराव दराडे, सावरगावचे विद्यमान सरपंच रमेश पवार, एकनाथ सहाने व ज्येष्ठ नेते पाटीलबुवा सावंत 
यांनीदेखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या समारंभास महसूलमंत्री‍ बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तसेच आमदार सुधीर तांबे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, प्रदेश काँग्रेसचे महासचिव मोहनदादा जोशी, राजाराम देशमुख उपस्थित होते.

मधुकरराव नवले यांनी या वेळी श्रद्धेय भाऊसाहेब थोरात हेच आमचे विद्यापीठ असून,  थोरात यांच्यासमवेत यापूर्वीही काम केलेले असल्यामुळे स्वगृही परतण्याचा आनंद झाल्याचे व्यक्त केले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये अकोले तालुका पुरोगामी विचारांचा तालुका असून, स्वातंत्र्याची चळवळ येथे रुजली वाढलेली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्व ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे स्वागत करून संघटनात्मक ताकद देणार असल्याचे मत व्यक्त केले. मधुकरराव नवले मीनानाथ पांडे हे राज्यपातळीवरील नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख