ऊर्जामंत्र्यांच्याच जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर कसे ? तनपुरेंना या नेत्यांचा खोचक टोला - bjp latest news, energy minister's district's farmers on road, bjp's strick. Vikhe Patil's criticism on Tanpur | Politics Marathi News - Sarkarnama

ऊर्जामंत्र्यांच्याच जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर कसे ? तनपुरेंना या नेत्यांचा खोचक टोला

सतीश वैजापूरकर
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

या बिघाडी सरकारने भरमसाठ रकमेची वीज बिल पाठवून राज्यातील जनतेची जाणीवपूर्वक कोंडी केली.

राहाता : उर्जा राज्यमंत्री जिल्ह्यातील तरीही शेतकऱ्यांना विज वितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर यावे लागते. मोफत विज देण्याची घोषणा झाली. उपमुख्यमंत्री असा निर्णय झाल्याचे सांगतात. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चालते ते समजत नाही. पदांसाठी सतत संघर्ष करून दमलेल्या महाविकास आघाडी सरकारकडे जनतेच्या कामासाठी उर्जा राहिली शिल्लक नाही, अशी टीका भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात राहाता येथे हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, राहात्याचे माजी नगराध्यक्ष डाॅ. के. वाय. गाडेकर, पंचायत समिती सभापती नंदा तांबे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुंकूद सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, प्रताप जगताप, ओमेश जपे, बाळासाहेब जपे तसेच शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

विखे पाटील म्हणाले, की कोरोना काळात अडचणीत आलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. पण या बिघाडी सरकारने भरमसाठ रकमेची वीज बिल पाठवून राज्यातील जनतेची जाणीवपूर्वक कोंडी केली. वीज बिल भरण्याची होत असलेली सक्ती, वीज कनेक्शन तोडण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करून शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची करण्यात आली.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, रावसाहेब देशमुख, बाळासाहेब जपे, नंदकुमार जेजूरकर यांचीही भाषणे झाली. 

दरम्यान, आज भाजपच्या वतीने जिल्हाभर आंदोलने झाली. बहुतेक ठिकाणी वीज वितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकून सरकारचा निषेध करण्यात आला.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख