नगरमध्ये भाजपचा उमेदवार पळविला ! `स्थायी`साठी मनोज कोतकर राष्ट्रवादीत - BJP candidate kidnapped in the city! Manoj Kotkar in NCP for 'Standing' | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

नगरमध्ये भाजपचा उमेदवार पळविला ! `स्थायी`साठी मनोज कोतकर राष्ट्रवादीत

मुरलीधर कराळे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

भाजपच्या हाती महापालिकेची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय डाव टाकत भाजपचाच उमेदवार पळविला आहे.

नगर : महापालिकेत स्थायी समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने राजकारण पेटले आहे. भाजपच्या हाती महापालिकेची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकीय डाव टाकत भाजपचाच उमेदवार पळविला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे शुक्रवारी मतदान घेण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात वेगळे वळण लागले आहे. 

या निवडणुकीत शिवसेनेकडून योगिराज गाडे यांनीही अर्ज दाखल केला आहे. कोतकर यांनी अचानक भाजपला धक्का देत राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचे नगरसेवक अवाक झाले. यापूर्वी ते भाजपकडून उमेदवारी करणार होते. या घडामोडीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विरोधी पक्षनेेते संपद बारस्कर यांनी ऐनवेळी खेळी खेळल्याचे मानले जाते. 

सध्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायीचे सभापतीपद भाजपला घेण्यासाठी प्रयत्न सुरू होता. मात्र ऐनवेळी भाजपलाच कोतकर यांनी धक्का दिल्याने भाजपला आता उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ येणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख