नगर : जिल्ह्यातील दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन उद्या (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होत आहे. हे व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे होत आहे. त्याचे प्रक्षेपण जिल्ह्यातील नागरिकांना पाहता यावे, यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी झाली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंधेला आज पंतप्रधानांनी ट्विट करून हा कार्यक्रम नक्की पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या निमित्ताने जिल्ह्याचा मोठा गाैरव झाला आहे.
पंतप्रधानांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा गाैरव करताना कृषी आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील, असे म्हटले आहे. पंतधानांनी केलेेला हा गाैरव जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.
पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ``मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ काॅन्फरंसिंगच्या माध्यमातून बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा.``

