पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगर महापालिकेने घेतला हा मोठा निर्णय

पाणीपुरवठा विभागाचा विषय येताच सातपुते म्हणाले, की 20 वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागात 129 कर्मचारी काम करीत होते. त्यांतील 100 कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची गरज आहे.
Nagar Mahapalika1.jpg
Nagar Mahapalika1.jpg

नगर : महापालिकेचा पाणीप्रश्‍न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने हा प्रश्‍न वारंवार उद्‌भवत होता. त्यावर आता मात करण्यात आली असून, पाणीपुरवठा विभागासाठी तात्पुरत्या स्वरूपात 109 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. 

स्थायी समितीची सभा सभापती अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मुदस्सर शेख, विजय पठारे, रवींद्र बारस्कर, श्‍याम नळकांडे, सुप्रिया जाधव, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, यशवंत डांगे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, नगरसचिव एस. बी. तडवी, यंत्रअभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभागाचे रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते. 

सभेत पाणीपुरवठा विभागाचा विषय येताच सातपुते म्हणाले, की 20 वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागात 129 कर्मचारी काम करीत होते. त्यांतील 100 कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची गरज आहे. महापालिकेकडे बिगारी कमी आहेत. 

यावर प्रकाश भागानगरे यांनी, 21 वर्षांत शहर वाढले; पण कर्मचारी निम्मेही राहिले नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी असल्याचे मत सातपुते यांनी मांडले. त्यावर सर्वांनी एक होत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी परिमल निकम म्हणाले, की पाण्याची उपलब्धता व्यवस्थित आहे; वितरण व्यवस्थेत अडचणी आहेत. कर्मचारी मिळाल्यास व्यवस्थेत दुरुस्ती होईल, सर्वांना पुरेसे पाणी मिळेल. 

सभापती घुले यांनी, व्हॉल्व्हमनला भ्रम झाला आहे. त्यांना पर्याय नाही. कामचुकारपणा करणाऱ्यांना नवीन कर्मचारी पर्याय आहेत. नगर-कल्याण रस्ता परिसराच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल, अशी आशा घुले यांनी व्यक्‍त केली. 
जिल्हा रुग्णालयाच्या पाणीपट्टीची शास्ती माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवीण मानकर यांनी पाणीपट्टीत वाढ करण्याची सूचना मांडताच सभापती घुले यांनी, आधी मालमत्ताकराची वसुली करा. आधीच वसुली विभागाचे 109 कर्मचारी कोविड कामात गुंतले असल्याचे सांगितले. कोरोना लसीकरण व कोरोना उपाययोजनेवरही चर्चा झाली. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून ओपन जिमसाठीचा दोन नगरसेवकांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, तसेच या योजनेचा वापर करण्यासाठी नगरसेवकांनी उत्सुकता दाखविली. 

ऑफलाइन सभेत कोतकर ऑनलाइन 

स्थायी समितीची आजची सभा ऑफलाइन होती. या सभेत मनोज कोतकर यांनी दूरध्वनीवरून सहभाग घेतला. त्यांनी केडगावमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली, तसेच पथदिव्यांचा प्रश्‍न उचलून धरला. शहरात पथदिव्यांचा प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com