मोठा निर्णय ! अण्णा हजारेंचे उपोषण मागे ! चाैधरी, फडणवीस, महाजन यांच्या शिष्टाईला यश - Big decision! Anna Hazare's fast back! Success to the discipline of Chaidhary, Fadnavis, Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

मोठा निर्णय ! अण्णा हजारेंचे उपोषण मागे ! चाैधरी, फडणवीस, महाजन यांच्या शिष्टाईला यश

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या (ता. 30) जाहीर केलेले उपोषण आज मागे घेतल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत 15 मुद्दे त्यांनी केंद्र सरकारपुढे ठेवले असून, त्यासाठी एक समिती स्थापन होत आहे.

नगर, ता. 29 ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या (ता. 30) जाहीर केलेले उपोषण आज मागे घेतल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत 15 मुद्दे त्यांनी केंद्र सरकारपुढे ठेवले असून, त्यासाठी एक समिती स्थापन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचशे प्रश्न सुटतील, त्यावर माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

हजारे यांनी उपोषण करू नये, यासाठी गेल्या आठवड्यापासून भाजपनेत्यांनी राळेगणसिद्धी वारी सुरू केली. प्रारंभी माजी मंत्री गिरीश महाजून येऊन गेले. नंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. त्यानंतर केंद्रात एक समिती स्थापन होऊन हजारे यांच्या मागण्यांबाबत बैठका झाल्या. त्याची माहिती घेऊन आज केंद्रीय कृषीमंत्री कैलास चाैधरी राळेगणसिद्धीत आले. या वेळी फडणवीस, महाजन तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

आज सुमारे चार तास झालेल्या चर्चेनंतर हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला. यावेळी बोलताना हजारे म्हणाले, की  राष्ट्रहितासाठी आंदोलने करावी लागतात. लोकांचा तो अधिकार आहे. अन्याय, अत्याचार होत असेल, तर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे आवश्यक असते. म्हणून मी अनेक वर्षे आंदोलन करीत आहे. या व्रर्षी शेतकर्यांचे प्रश्न मांडले. पिक उत्पादन केल्यानंतर त्याचा खर्चही शेतकऱ्यांना मिळत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी मी आग्रही राहिलो. शेतकऱ्यांना उत्पादित खर्चासह 50 टक्के अतिरिक्त दर मिळावा, अशी मागणी अनेकदा केली. त्यासाठीच उद्यापासून उपोषण करण्याचे ठरविले होते. आज केंद्रातील मंत्री येथे आले. त्यांनी आपल्या 15 मुद्दे असलेल्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यासाठी लवकरच समिती स्थापन होऊन शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय होणार आहे. केंद्र सरकार याबाबत चांगला निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे उद्याचे आंदोलन स्थगित करीत असल्याचे हजारे यांनी जाहीर केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख