भाऊबंदकी, राजकीय गट-तट हेच `बिनविरोध`च्या झारीतील शुक्राचार्य - Bhaubandaki, a political faction, is the Shukracharya of 'unopposed' | Politics Marathi News - Sarkarnama

भाऊबंदकी, राजकीय गट-तट हेच `बिनविरोध`च्या झारीतील शुक्राचार्य

मार्तंड बुचुडे
रविवार, 27 डिसेंबर 2020

आमदार लंके यांना मानणाऱ्या व त्यांच्याच राष्ट्रावादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याच गावात, तरी या निमित्ताने निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. आता या निमित्ताने खरा कस आमदार लंके यांचा लागणार आहे.

पारनेर : तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील, त्या गावांसाठी 25 लाख रूपयांचा विकास निधी देण्यात येईल, असे आमदार निलेश लंके यांनी जाहीर केले आहे. मात्र गावागावात असलेले गटतटाचे राजकारण तसेच भाऊबंदकी व विविध राजकिय पक्ष या मुळे किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात व त्याला कितपत प्रतिसाद मिळणार, हे आगामी काळतच समजणार आहे. मात्र या मुळे आमदार लंके यांची खरी कसोटी लागणार आहे.

आमदार लंके यांना मानणाऱ्या व त्यांच्याच राष्ट्रावादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याच गावात, तरी या निमित्ताने निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. आता या निमित्ताने खरा कस आमदार लंके यांचा लागणार आहे.

तालुक्यातील 88 व नगर तालुक्यातील 22 अशा एकूण 110 ग्रामपंचायतींच्या निवडणुक होत आहे. त्यासाठी 15 जानेवारी ला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा व सरकारी खर्चही वाचवा, यातून गावात ऐक्य व शांताता राहावी, हा या पाठिमागचा हेतू आहे. तसेच आमदार लंके यांनी बिनविरोध निवडणूक करमाऱ्या गावासाठी निधीही देण्याचे जाहीर केले आहे.

आता तालुक्यातच नव्हे, तर मतदार संघात अनेक गावात आमदार लंके यांना मानणा-या कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. तसेच पक्षाचेही कार्यकर्ते आहेत, मात्र गावपातळीवर ते अनेकदा एकत्र नसतात. गावपातळीवर भाउबंदकी तसेच हेवे दावे असतात, त्यातून निवडणुका होत असतात. त्यामुळे अनेक गावात बिनविरोध निवडणुकीसाठी लंके यांनी त्या गावासाठी 25 लाखाचा निधी जरी जाहीर केला असला तरीही त्यांना तेथे आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके हे आमदार लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पिंपरी जलसेन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार का? हे पाहणे पारनेरकरांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. त्या मुळे अ‍ॅड. शेळके शेळके यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष आहे. 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख