सावधान, कोरोना वाढतोय ! जिल्हाधिकारी भोसले यांचे प्रशासनास हे आदेश - Beware, Corona is growing! This order to the administration of Collector Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

सावधान, कोरोना वाढतोय ! जिल्हाधिकारी भोसले यांचे प्रशासनास हे आदेश

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

नगर : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनास दिले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, की जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, उपरुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व कोविड केअर सेंटर आदी ठिकाणी रुग्णांसाठी आवश्‍यक असणारी सर्व यंत्रणा सुस्थितीत आहे का, याची पडताळणी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन करावी.

हेही वाचा... जिल्हा बॅंकेला पुन्हा 27 लाखांना गंडा

रोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील किमान 20 व्यक्‍तींचा शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे. खासगी डॉक्‍टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना ताप असल्यास त्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करावी. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करावी. 

हेही वाचा... पाठकबाई म्हणते, रोहित पवार हेच राणादा

एखाद्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यास त्यास कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करा. शाळा, विद्यालये व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची तपासणी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी, तसेच हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहकांना अनुमती द्यावी. त्याकडे दुर्लक्ष केल्यास राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे. 

 

हेही वाचा...
किसान सभेचा "रेल रोको' पोलिसांनी अडविला 

नगर : दिल्लीच्या सीमेवर अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे नगर रेल्वेस्थानकात "रेल रोको' आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारातच आंदोलकांना अडविले. अखेर आंदोलकांनी स्टेशन प्रबंधकांना निवेदन दिले. 

आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव ऍड. सुभाष लांडे, मारुती भापकर, बन्सी सातपुते, ऍड. सुधीर टोकेकर, आर्किटेक्‍ट अर्शद शेख, संजय नांगरे, फिरोज शेख, सतीश पवार, सलीम सय्यद, भारती न्यालपेल्ली, लक्ष्मी कोटा, शारदा बोगा, सिंधूताई त्र्यंबके, डॉ. महेबूब सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे आदींनी सहभाग घेतला. 

लांडे म्हणाले, ""नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना देशोधडीस लावणारे आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करून केंद्र सरकार दडपशाही करीत आहे. झोडा, तोडा व राज्य करा, हे ब्रिटिशांचे तंत्र भाजप सरकार अवलंबित आहे.'' 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख