बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री करायचंय, कामाला लागा !

मंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जात असलेल्या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत नेवासे येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना नागवडे बोलत होते.
balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg

नेवासे : महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजिवनी देणार्‍या राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना भविष्यात मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे आवाहन श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांनी केले आहे. 

मंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जात असलेल्या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत नेवासे येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना नागवडे बोलत होते.

या वेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, कार्लस साठे, गणपत सांगळे, सुदाम कदम,अंकुश कानडे, ज्ञानदेव वाफारे,नेवासे प्रभारी ज्ञानेश्वर मुरकुटे, युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, राजेंद्र वाघमारे उपस्थिती होती. 

सचिन गुजर म्हणाले, "काँग्रेसचे राज्याचे नेतृत्व आपल्या जिल्ह्यात आहे, हे आपले भाग्यच आहे. कार्येकर्त्यांनी जिल्हा काँग्रेसमय करण्यासाठी झपाटून कामाला लागावे.
यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, उपाध्यक्ष सुनील भोगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, शहराध्यक्ष रंजन जाधव,संदीप मोटे, सचिन बोर्डे, तनवीर शेख, चंद्रशेखर कडू उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले. 
 

हेही वाचा..

नेवाशाचा चेहरामोहरा बदलणार : गडाख 

नेवासे : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार विकासकामांच्या माध्यमातून नेवासे शहरासह उपनगराचा चेहरामोहरा बदलू, अशी ग्वाही महिला बचतगट चळवळीच्या नेत्या सुनीता गडाख यांनी दिली. 

नगरपंचायतीअंतर्गत साडेतीन कोटींच्या निधीचे शहरातील रस्ता कॉंक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, भुयारी गटार, अशा विविध विकासकामांना गडाख यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. नंदकिशोर खरात महाराज, गहिनीनाथ आढाव महाराज, नगराध्यक्ष योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, नारायण लोखंडे, अनिल ताके, दिलीप जामदार, पोपट जिरे, अंबादास लष्करे उपस्थित होते. 

गडाख म्हणाल्या, की नेवासेकरांनी सहकार्याची भूमिका घेऊन चांगल्या कामाच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. कामे दर्जेदार होण्यासाठी नागरिकांनीदेखील लक्ष घालावे. 
गडाख यांच्या हस्ते खळवाडी, देशमुख गल्ली, लोखंडे गल्ली, कामिनपीर, नुराणी मस्जिद, रामकृष्णनगर, ज्ञानेश्वर मंदिर रस्ता परिसर, गंगानगर, लक्ष्मीनगर, अहिल्यानगरसह उपनगरातील विविध नऊ प्रभागातील कामांना प्रारंभ झाला. सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर आभार सतीश पिंपळे यांनी मानले. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com