बबनराव पाचपुते यांच्या `साईकृपा`च्या गाळपाला या नेत्यांची आडकाठी - babanrao pachpute, Saikrupa sugar factory oppose leaders | Politics Marathi News - Sarkarnama

बबनराव पाचपुते यांच्या `साईकृपा`च्या गाळपाला या नेत्यांची आडकाठी

संजय आ. काटे
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

नाहाटा व भोस यांनी पुण्यातील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 

श्रीगोंदे :  तालुक्‍यातील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट बाकी आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलने होऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कारखान्याने थकबाकी दिल्याशिवाय त्यांना गाळपास परवानगी देऊ नये, अशी मागणी पाचपुते गटाचे समर्थक असणारे बाळासाहेब नाहाटा व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी केली आहे. 

नाहाटा व भोस यांनी पुण्यातील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यावर साखर आयुक्त गायकवाड यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी फोनवर संपर्क साधला. तहसीलदार प्रदीप पवार यांना तातडीने लिलावप्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केल्याचा दावा नाहाटा व भोस यांनी केला. 

हेही वाचा... अंधःश्रद्धेतून मंदिराच्या पायात पुरले सोने

शेतकऱ्यांसह अनेक बॅंकांची साईकृपा कारखान्याकडे थकबाकी आहे. मोठ्या अडचणीतून हा कारखाना आठ दिवसांत सुरू करणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यास या दोघांनी आक्षेप घेतला आहे. 

हेही वाचा..

नऊ एकरांचा व्यवहार ठरला, विक्री केली 20 गुठ्यांची

श्रीगोंदे : बनावट माणसे उभी करून दुसऱ्याच्या जमिनीची परस्पर विक्री करीत नगरच्या व्यावसायिकास 1 कोटी 55 लाख 21 हजार 300 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे, त्यातही 9 एकरांचा व्यवहार ठरला असता, प्रत्यक्षात 20 गुंठ्यांचाच विक्री केली. विशाल संपत वाघमारे (रा. कोळगाव), रवी संजय ढवळे (रा. श्रीगोंदे), विश्वजीत रमेश कासार (रा. वाळकी, ता. नगर), सुनील फक्कड आडसरे, इंद्रजित रमेश कासार (रा. वाळकी), कोमल विश्वजीत कासार (रा. वाळकी) यांच्यासह दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

हेही वाचा...  तहसीलसमोर केली चूल अन थापल्या भाकरी

याबाबत सूर्यकांत रावसाहेब कोल्हे (रा. नगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी कोल्हे यांची 5 जुलै 2020 रोजी आरोपी विश्वजित कासार याच्याशी वाघोली (पुणे) येथे ओळख झाली. कासार याने कोल्हे यांना फोनवर बागायती जमीन घ्यायची का, असे विचारत घोटवी येथील आनंद शेजवळ यांची 9 एकर जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्यानुसार कोल्हे यांनी घोटवी येथे जाऊन जमिनीची पाहणी केली. त्यानंतर 12 जुलै रोजी 1 कोटी 80 लाख रुपयांना व्यवहार ठरला. व्यवहारापोटी 5 लाख रुपयांचे टोकन व खरेदीसाठी लागणारा खर्च 9 लाख 50 हजार, असे एकूण 14 लाख 50 हजार रुपये कोल्हे यांनी दिले. नंतर 13 जुलै रोजी जमिनीचा खरेदी व्यवहार झाला. त्यावेळी बनावट लोकांना उभे करून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयातील सेवा ठप्प झाल्याने, दुसऱ्या दिवशी (14 जुलै) खरेदी झाली. त्याचा फायदा घेत आरोपींनी कागदपत्रांत बदल केला. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख