पुणे बाजार समितीत गैरव्यवहार करून बी. जी. देशमुख यांनी अकोले तालुक्यात वाटले किराणा कीट : सुरेश घुले - B. by misconduct in Pune Market Committee. G. Deshmukh thinks groceries in Akole taluka: Suresh Ghule | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे बाजार समितीत गैरव्यवहार करून बी. जी. देशमुख यांनी अकोले तालुक्यात वाटले किराणा कीट : सुरेश घुले

मुरलीधर कराळे
शनिवार, 18 जुलै 2020

आशिया खंडातील महत्त्वाची असलेल्या पुणे कृषी उत्पन्न समितीत कोट्यवधी रुपये कमविणारे बी. जे. देशमुख यांनी अकोले तालुक्यात उभारलेल्या संपत्तीची व राज्यात व बाहेर राज्यात देशाबाहेर असलेल्या संपत्तीची चौकशी करावी.

नगर : पुणे कृषी उत्पन्न समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी पुणे कृषी उत्पन्न समितीत भ्रष्टरचार करून त्यातील किराणा व साहित्य कोरोनाच्या काळात अकोले तालुक्यात आणून वाटले, असा गाैप्यस्फोट पुणे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला.

दरम्यान, बी. जे. देशमुख यांनी हे सर्व आरोप खोडून काढले असून, काही लोकांवर कारवाई केल्याने त्यांनी हे आरोप केल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

घुले म्हणाले, की पुणे बाजार समितीवर गेल्या 12 वर्षापासून प्रशासक आहे. ते निवडणुका होऊ देत नाहीत. काही ना काही कारण काढून तेच प्रशासक राहतात. देशमुख यांच्या अकोले तालुक्यात जमिनी आहेत. त्यांचे असे अनेक व्यवसाय आहेत, की ज्याद्वारे ते गैरव्यवहार करतात. त्यामुळे त्यांची चाैकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी आपण वरिष्ठांकडे केली आहे.

शरद पवार यांच्याकडे तक्रार

आशिया खंडातील महत्त्वाची व राज्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न समिती ही पुणे येथे असून, त्यात कोट्यवधी रुपये कमविणारे देशमुख यांनी अकोले तालुक्यात उभारलेल्या संपत्तीची व राज्यात व बाहेर राज्यात देशाबाहेर असलेल्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणीही घुले यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात घुले यांनी मंत्र्यांना निवेदने दिली असून, त्यावर अनेक नेते व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

ते आरोप बिनबुडाचे ः देशमुख

माझ्याविरोधात केलेले हे आरोप बिनबुडाचे आहेत. बाजार समिती व कारखाना संबंधितांवर केलेल्या कारवाईमुळे काही व्यक्ती दुखावल्या जावून त्यांनी असे आरोप केल्याचे पुणे कृषी उत्पन्न समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख