शवविच्छेदनाचा अहवाल ! गाैरी गडाख यांची आत्महत्या गळफास घेऊनच - Autopsy report! Gary Gadakh's suicide by strangulation | Politics Marathi News - Sarkarnama

शवविच्छेदनाचा अहवाल ! गाैरी गडाख यांची आत्महत्या गळफास घेऊनच

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

गाैरी गडाख यांनी काल गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले असल्याचे अपर पोलिस अधीक्षक साैरभकुमार अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नगर : माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सून व यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी गाैरी गडाख यांनी काल गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले असल्याचे अपर पोलिस अधीक्षक साैरभकुमार अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

काल दुपारी गाैरी यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळून आला होता. त्यांना नगरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या मृत झाल्या असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. त्याचा प्राथमिक अहवाल आला असून, त्यात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

वहिनीसाहेबांसाठी सोनई परिसर गहिवरला

दरम्यान, गळफास घेऊन आत्महत्या झाल्याचे समजताच सोनई परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. वहिनीसाहेब म्हणून त्या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. महिलांचे संघटन, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांची तळमळ विशेष होती. त्यामुळे महिलांमधून हळहळ व्यक्त होत होती. अंत्यसंस्काराच्या वेळी सोनई व परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. आज सकाळपासून सोनई गाव पूर्णपणे बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख