अण्णांची मनधरणी सुरू ! फडणवीस यांच्यासोबत `संकटमोचक`ही उपस्थित - Anna's mindset begins! Sankatmochak is also present with Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णांची मनधरणी सुरू ! फडणवीस यांच्यासोबत `संकटमोचक`ही उपस्थित

एकनाथ भालेकर
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

आज सायंकाळी सहा वाजता फडणवीस, महाजन, विखे पाटील यांचे राळेगणसिद्धीत आगमन झाले. त्यानंतर हजारे यांच्याशी त्यांच्यात चर्चा सुरू झाली.

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी 30 जानेवारी पासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार असल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राळेगणसिद्धी गाठले. उभयतांमध्ये चर्चा सुरु झाली. या वेळी भाजपचे संकट मोचक आमदार गिरीष महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार बाबुराव पाचर्णे आदी चर्चेत उपस्थित आहेत.

आज सायंकाळी सहा वाजता फडणवीस, महाजन, विखे पाटील यांचे राळेगणसिद्धीत आगमन झाले. त्यानंतर हजारे यांच्याशी त्यांच्यात चर्चा सुरू झाली.

स्वामीनाथन आयोगानुसार शेती शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, यासाठी हजारे उपोषण आंदोलन करणार आहेत. हजारे यांनी सन २०१८ व २०१९ या  दोनही वर्षी आंदोलन केले होते. या वेळी पंतप्रधान कार्यालय, तत्कालिन कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत तसेच कृषीमंत्री राधामोहन सिंह, फडणवीस यांनी हजारे यांना लेखी आश्वासन दिले होते. त्यात केंद्र सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचे निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. तसेच केंद्रीय कृषिमूल्य आयोग आला स्वायत्तता देण्यासाठी अधिकार समिती आपण तातडीने स्थापन करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु तीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही मोदी सरकारने हे आश्वासन पाळले नाही. हजारे यांनी अनेकदा पत्र पत्रव्यवहार केला. परंतु त्याचे काही उत्तर आले नाही.

त्यामुळे अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फडणवीस आज अण्णांची मनधरणी करण्यासाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत. फडणवीसांना अण्णांना उपोषणापासून परावृत्त करण्यापासून यशस्वी होतात, की अण्णा त्यांच्या उपोषणावर ठाम राहतात हेच आता चर्चेदरम्यान पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख