आमदार बागडे, खासदार कराड यांच्याकडून अण्णा हजारे यांची मनधरणी - Anna Hazare's condolences from MLA Bagde, MP Karad | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार बागडे, खासदार कराड यांच्याकडून अण्णा हजारे यांची मनधरणी

मार्तंड बुचुडे
सोमवार, 21 डिसेंबर 2020

केंद्रसरकारने नव्याने केलेल्या शेतकरी कायद्यांचीही माहिती हजारे यांना दिली. या वेळी हजारे यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत व नवीन कृषी कायद्यावर मी बोलणार नाही. मी माझ्या मागण्यावर ठाम आहे, असे सांगितले.

पारनेर : केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याबाबत आज आज विधानसभेचे माजी सभापती व आमदार हरीभाऊ बागडे व खासदार डॉ. भागवत कराड यांनी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. अण्णांची मनधरणी केली, मात्र आपण आंदोलनावर ठाम असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.

केंद्रसरकारने नव्याने केलेल्या शेतकरी कायद्यांचीही माहिती हजारे यांना दिली. या वेळी हजारे यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत व नवीन कृषी कायद्यावर मी बोलणार नाही. मी माझ्या मागण्यावर ठाम आहे, असे सांगितले.

आज बागडे व कराड यांनी हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी हजारे यांनी नवीन कृषी कायद्याबाबत काहीच न बोलता मला केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी जे आश्वासन दिले, ते पाळले नाही, त्यामुळे मी पुन्हा आंदोलनाचा विचार मांडला आहे. मार्च 2018 साली दिल्लीत व फेब्रुवारी 2019 साली राळेगणसिद्धीत मी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलन केले, त्यावेळी केलेल्या मागण्यांबाबत मला केंद्रीय कृषीमंत्री, तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व संरक्षण राज्यमंत्री यांनी लेखी आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळले नाही. त्यास दोन वर्ष झाली. त्यामुळे मी आंदोलनाचा विचार करत आहे, असे हजारे यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर  स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, त्यासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव सरकराने शेतकऱ्यांना द्यावा, कृषी मुल्य आयोगास स्वयत्तता द्यावी व भाजीपाला दुध व फळेयांनाही उत्पदन खर्चावर अधारीत बाजार भाव दिला, तसेच ठिबक व तुषार सिंचनवर अनुदान दिले, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असेही म्हणाले.

या वेळी कराड व बागडे यांनी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कृषी कायद्याची माहिती हजारे यांनी दिली. तो कसा शेतकरी हिताचा आहे, हेही सांगितले. या वेळी त्यांनी कृषीसुधार विधयकाची मराठी भाषेत रूपांतरित केलेली पुस्तिकाही हजारे यांनी माहितीसाठी दिली. या वेळी हजारे यांनी नव्याने केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यातील काही कायदे रद्द केले, तरी शेतकऱ्यांचे  प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी मी माझ्या मागण्यांवर  ठाम आहे.

कराड, बागडे यांनी दिले हे आश्वासन 

तुमची मागण्या योग्य व शेतकरी हिताच्या आहेत. तुमचे गाऱ्हाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पोहच करू. मात्र सध्या तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ. तसेच लवकरच आपली एकत्रीत या विषयावर बैठकही लावू, अशे आश्वासन या वेळी बागडे व खासदार कराड यांनी दिले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख