अण्णा भाऊ साठे यांना `भारतरत्न`साठी पंतप्रधानांना फडणवीस साकडे घालणार - Anna Bhau Sathe will be handed over to the Prime Minister for Bharat Ratna | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णा भाऊ साठे यांना `भारतरत्न`साठी पंतप्रधानांना फडणवीस साकडे घालणार

सुनिल गर्जे
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

लवकरच यासंदर्भातील विनंती पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

नेवासे : सामाजिक, साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असेलेले साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्याकडे भाजपचे राज्य पॅनेलिस्ट समितीचे सदस्य नितीन दिनकर यांनी निवेदन देवून केली.

दरम्यान, लवकरच यासंदर्भातील विनंती पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. नेवासे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेवून चर्चा करत निवेदन दिले. या वेळी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे उपस्थित होते.

निवेदनात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आण्णा भाऊ साठे यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी केलेल्या चळवळीमुळे आज मुंबई ही महाराष्ट्रात आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिफारस करावी, अशीही मागणी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या भेटी दरम्यान नितिन दिनकर यांनी त्यांचा पुस्तक देवून सत्कार केला. या वेळी झालेल्या चर्चेप्रसंगी आपण लवकरच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात विनंतीपत्र पाठवणार आहोत, तसेच यासाठी पाठपुरावा करण्याचेही फडवणीस यांनी दिनकर व गोरखे यांना आश्वासन दिले. 

ते पंतप्रधानांना पत्र पाठविणार

"लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येवून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री फडवणीस यांना निवेदन दिले. यांनीही आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी याबाबत पंतप्रधानांना विनती पत्र पाठविण्याचे आश्वासन दिले, असे नितीन दिनकर यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख