अजितदादांची ही स्टाईल आमदार रोहित पवार यांना भावते - Ajit Pawar's style impressed MLA Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांची ही स्टाईल आमदार रोहित पवार यांना भावते

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून, ती मला भावते, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

नगर : कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून, ती मला भावते, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर म्हटले आहे. जामखेड-कर्जत मतदारसंघातील प्रश्नांबाबत आज अजित पवार यांनी आमदार पवार यांनी भेट घेतली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले, असे पवार यांनी म्हटले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी आमदार पवार यांचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी संबंधित मंत्र्यांकडे जाऊन ते हे प्रश्न घेऊन जातात. आज जामखेड तालुक्यातील काही प्रश्न घेऊन ते अजित पवार यांच्याकडे गेले. तेथे त्यांच्याशी चर्चा करून संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवार यांनी आश्वासन दिले असल्याचे आमदार पवार यांनी म्हटले आहे. 

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की मतदारसंघातील व इतर प्रश्नांबाबत अजित पवार दादांना भेटलो. हे प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून, ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख