अकोले : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शब्द अंतिम मानत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत व सुरेश गडाख हे जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीतून उद्या (ता. 11) माघार घेणार आहेत. तसेच त्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात अमित भांगरे यांचा अर्ज ठेवण्याचा निर्णय आज अकोले विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
हेही वाचा... जिल्हा बॅंकेवर विवेक कोल्हे बिनविरोध
या वेळी बोलताना दशरथ सावंत म्हणाले, की नाशिक येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीतून आपले अर्ज मागे घेत आहोत. त्यांचा शब्द अंतिम मानून मी स्वतः व सुरेश गडाख दोघेही निवडणुकीतून माघार घेत आहोत. बॅंक निवडणुकीबाबत सर्व चर्चा सार्वजनिक व्हावी म्हणून आपण पत्रकार परिषदेत हे सांगत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
सहकाराचे शुद्धीकरण करण्यासाठी आपण निवडणूक लढवीत होतो, परंतु अजितदादा यांनी आपल्याला शब्द दिला आहे, की करखान्यात सहकार्य करू. आपली उमेदवारी ही पक्षाची होती, परंतु शबद्धप्रमाण म्हणून मी मागे घेत असल्याचे गडाख यांनी सांगितले.
हेही वाचा...
पाथर्डीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
पाथर्डी : तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील 39 ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडी झाल्या.
गावनिहाय सरपंच व उपसरपंच : शिराळ- रवींद्र मुळे, अमोल घोरपडे. आडगाव- जगन्नाथ लोंढे, सखूबाई गर्धे. जवखेडे दुमाला- मंदा कसोटे, भास्कर नेहुल. हनुमान टाकळी- मीना शिरसाट, सुनिता बर्डे. कोपरे- छाया उघडे, नारायण वाघमोडे. नांदुर निंबादैत्य- अनुसया दहिफळे, भागवत वाघ. सुसरे- वैशाली कंठाळी, जयश्री उदागे. निपाणी जळगाव- अंजली गर्जे, संदीप पठाडे, दुलेचांदगाव- अर्चना शेळके, रणजीत बांगर. कळसपिंप्री- ज्योती भवर, मोनिका पवार. शेकटे- सुनिता घुले, अशोक घुले. रांजणी- शीला पवार, ज्ञानदेव मुंडे. कारेगाव- मीरा भाबड, जालिंदर दहिफळे.
हेही वाचा.. कोल्हारमध्ये विखेंचीच चलती
सांगवी बुद्रुक- सुवर्णा एकशिंगे, संदीप लोखंडे. मढी- संजय मरकड, रवींद्र आरोळे. माळीबाभूळगाव- उपसरपंच- सुनिता जाधव. भोसे- प्रमिला टेमकर, संदीप साळवे. लोहसर- हिरा गिते, शोभा गिते. पारेवाडी- आसराबाई तनपुरे, बाळासाहेब आठरे. मोहोज बुद्रुक- सोनाली जाधव, रामनाथ डोळसे. घाटशिरस- गणेश पालवे, अलका चोथे. सातवड- दशरथ पाठक, दादासाहेब सरोदे. अकोला- संभाजी गर्जे, अझुन धायतडक. भारजवाडी- आशा बटुळे, चंद्रकला खाडे. खरवंडी कासार- प्रदीप पाटील, दिलीप पवळे. ढाकणवाडी- सुरेखा ढाकणे, सुनील ढाकणे. वाळुंज- अनिता शेळके, बाळासाहेब शेळके. जोगेवाडी- मुक्ता आंधळे, राजेंद्र आबिलढगे. जांबळी- राणी आव्हाड, किशोर दराडे. पिंपळगव्हाण- मोहिनी थोरे, मंगल पाखरे. मुंगुसवाडे- शीतल खेडकर, गयाबाई खेडकर. बोरसेवाडी- संजना बोरसे, रेखा बोरसे. लांडकवाडी- छबूबाई गर्जे, देवकी चव्हाण. पत्र्याचा तांडा- गणेश पवार, कौसाबाई पवार. पिरेवाडी- राणी बडे, बाबा पठाण. घुमटवाडी- शोभा चव्हाण, नितीन राठोड. पिंपळगाव टप्पा- पांडुरंग शिरसाट, ज्ञानेश्वरी शिरसाट. मोहटे- एरीना पालवे, नवनाथ दहिफळे. शिंगवे केशव- उपसरपंच- मंखाबाई घोरपडे.
माळीबाभूळगाव, शिंगवेचे सरपंचपद रिक्त
माळीबाभूळगाव व शिंगवे केशव येथे सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव निघाले. मात्र, या प्रवर्गातील सदस्य नसल्याने दोन्ही ठिकाणी सरपंचपदे रिक्त राहिली. येथील आरक्षण बदलासाठी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे.
Edited By - Murlidhar Karale

