प्रशांत गायकवाड यांचे अजितदादांनी ऐकले, केली ही घोषणा

मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
प्रशांत गायकवाड यांचे अजितदादांनी ऐकले, केली ही घोषणा
pawar and gaikwad.jpg

पारनेर : मजुर संस्थांना देण्यात येणाऱ्या कामांच्या निविदा प्रणालीमध्ये 3 लाखांवरून 10 लाख रूपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत  केली. 

मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

गायकवाड यांनी संचालक म्हणून निवडून आल्या नंतर गायकवाड यांनी राज्यातील मजुर सहकारी संस्थांपुढे अनंत अडचणी आहेत. त्यातच 10 वर्षांपूर्वी 15 लाख रूपयांपर्यंतची कामे मजुर संस्थांना देण्यात येत होती, मात्र मागील सरकारच्या काळात ही मर्यादातीन लाखांपर्यंत केली.

सिमेंट, लोखंड, खडी, वाळू, डबर याच्या वाढलेल्या किंमतीचा विचार करता तीन लाख रूपयांपर्यंत कोणतेही काम होणे शक्य नाही. त्यासाठीच कामांच्या मार्यादेत वाढ करणे गरजेचे होते. या मागणीसाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अनेक बैठका झाल्या.

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत हाच मुददा महत्वाचा ठरला होता. गायकवाड यांनी पवार व थोरात यांची भेट घेउन अधिवेशनात हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे साकडे घातले होते. त्यानुसार पवार यांनी बुधवारी (ता.10)विधानसभेमध्ये कामाची मर्यादा तिन लाखांवरून 10 लाख करण्याची घोषणा केली.

पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यावर टीका केली.त्यांच्या काळात कामाची मर्यादा वाढविण्यासाठी दोन्ही बाजूंचे सदस्य मागणी करीत असतानाही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले. दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच राज्यातील मजुर संस्थांच्या प्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन ही वाढ करण्यात येत असल्याचे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.मजूर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून गायकवाड यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.

मजूर संस्थांच्या जिव्हाळयाच्या प्रश्‍नावर सकारात्मक निर्णय घेतल्याबददल गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पवार व थोरात यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, मजूर संस्थांही ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. दहा लाखांची घोषणा केल्याने आता या संस्थांना कोणतेही कामे करताना अडचणी येणार नाहीत. संस्थांच्या अडचणींसाठी आपण कटिबद्ध असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.