अमदनगर जिल्हा बॅंक निवडणूक ! या माजी आमदारांचे अर्ज दाखल - Ahmednagar District Bank Election! Former MLA's application filed | Politics Marathi News - Sarkarnama

अमदनगर जिल्हा बॅंक निवडणूक ! या माजी आमदारांचे अर्ज दाखल

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या बॅंकेच्या संचालकपदासाठी 17 जणांनी 30 उमेदवारी अर्ज दाखल केले असून, गुरुवारी 140 अर्जांची विक्री झाली. 

नगर : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या बॅंकेच्या संचालकपदासाठी 17 जणांनी 30 उमेदवारी अर्ज दाखल केले असून, दिवसभरात 140 अर्जांची विक्री झाली. 

जिल्हा बॅंकेची निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे लढविण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनेही यामुळे वेग घेतला आहे. गुरुवारी दिवसभरात एकूण 140 उमेदवारी अर्जांची विक्री झाली, तर दिवसभरात 17 जणांनी 30 अर्ज दाखल केले. सर्वसाधारण मतदारसंघासह इतर मागास प्रवर्ग व शेतीपूरकमध्ये काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

दाखल अर्ज असे : अकोले ः सीताराम गायकर (तीन), जामखेड : जगन्नाथ राळेभात (दोन), कर्जत : अंबादास पिसाळ (दोन), पारनेर : दत्तात्रय म्हस्के, संगमनेर : दिलीप वर्पे, रंगनाथ फाळके, श्रीगोंदे : राहुल जगताप (तीन), श्रीरामपूर : करण ससाणे (दोन).

शेतीपूरक : वैभव पिचड, दादासाहेब सोनमाळी, सुभाष गुंजाळ.

बिगरशेती : प्रशांत गायकवाड, भगवानराव पाचपुते.

महिला राखीव : संगीता वाघ, मीनाक्षी पठारे, लताबाई वांढेकर.

अनुसूचित जाती-जमाती : वैभव पिचड (दोन).

इतर मागासवर्ग : अण्णासाहेब शेलार (दोन), करण ससाणे, दादा सोनमाळी. 

दरम्यान, अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. सोमवार (ता. 25) हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. शनिवारी व रविवारी सुटी असल्याने शुक्रवारी (ता. 23) व सोमवारी अर्ज दाखल होणार आहेत. उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येत असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नेमणूक झाली आहे. आतापर्यंत 456 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. 

दरम्यान, जिल्हा बॅंकेवर वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच पक्षांची चढाओढ असते. यापूर्वी राष्ट्रवादी, काॅंग्रेसचेच अनेकदा वर्चस्व राहिले आहे. या वेळी मात्र या दोन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते भाजपमध्ये असल्याने भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे बॅंकेवर वर्चस्वासाठी भाजप प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख