दिल्लीतील आंदोलन चिघळले ! इंटरनेट सेवा बंद, धुराच्या नळकांड्या फोडल्या - The agitation in Delhi simmered! Internet service shut down, smoke billowed | Politics Marathi News - Sarkarnama

दिल्लीतील आंदोलन चिघळले ! इंटरनेट सेवा बंद, धुराच्या नळकांड्या फोडल्या

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 26 जानेवारी 2021

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आज ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली असून, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आज बहुतेक ठिकाणची इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच शेतकऱ्यांना अडविताना धुराचे नळकांडे फोडण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने नव्याने केलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. आज प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली आहे. या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून अनेक राज्यांत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.

आज दिल्लीत आंदोलन रोखण्याचा एक भाग म्हणून मुकबरा चाैक, नांगलोई आदी भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, ती रात्री 12 वाजेपर्यंत बंदच राहणार आहे. अशा पाच ठिकाणच्या इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. ग्रीन लाईनवरील सर्व मेट्रोही बंद करण्यात आल्या आहेत. जामा मश्जित मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले असून, सध्या पोलिस व आंदोलक आमने-सामने आहेत. 

पोलिस शेतकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्याच मार्गावरून आंदोलकांनी जावे, असे सांगितले आहे, मात्र शेतकऱी ऐकत नसून, इतर मार्गानेही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घातले आहेत.

ट्रॅक्टरच्या साह्याने बॅरिकेटही हटविले

शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ट्रॅक्टरच्या साह्याने काही ठिकाणचे बॅरिकेटही हटविण्यात आले. त्यामुळे पोलिस आणि शेतकरी आमने-सामने येत आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. कोणत्याही क्षणी लाठीचार्ज होऊ शकेल, अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे.

नागरिकांना बाहेर येण्यास मज्जाव

दिल्लीतील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे. शेतकरी आंदोलन कोणत्याही क्षणी चिघळण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतेक रस्त्यावर ट्रॅक्टर, शेतकरी दिसत आहेत. स्थानिक नागरिक बाहेर पडताना दिसत नाही.

Edited By - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख