नगर जिल्ह्यात 906 कोरोना रुग्णांची भर - Addition of 906 corona patients in Nagar district | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

नगर जिल्ह्यात 906 कोरोना रुग्णांची भर

मुरलीधर कराळे
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात काल नवीन 906 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज किमान 800 पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांमधील कोविड सेंटरचे बेड फुल होत आहेत.

नगर : जिल्ह्यात काल नवीन 906 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज किमान 800 पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांमधील कोविड सेंटरचे बेड फुल होत आहेत. त्याचा परिणाम अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. 

काल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल रूग्ण संख्येत ९०६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ७६८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४५ संगमनेर ५, राहाता १, नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट १,नेवासा ७, श्रीगोंदा ४, अकोले १, राहुरी २, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४०३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६३, संगमनेर १०, राहाता २३,पाथर्डी ५, नगर ग्रामीण ५४, श्रीरामपुर २१, कॅंटोन्मेंट ९, नेवासा १९,  श्रीगोंदा ७, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ३१,शेवगाव ३,कोपरगाव ७, जामखेड ६ आणि कर्जत ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४०७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १७, संगमनेर २९, राहाता ४१, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट ०४, नेवासे ६४, श्रीगोंदा २२, पारनेर १२, अकोले ९, राहुरी ६६, शेवगाव २४, कोपरगाव २९, जामखेड १९ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

आता बरे झालेली रुग्ण संख्या: २८ हजार ५१२ झाली असून, सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत व कोविड सेंटरमध्ये ४ हजार ७६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्य़ंत जिल्ह्यात 533 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 33 हजार 813 रुग्णांची नोंद झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख