नगरमध्ये 756 कोरोना रुग्णांची भर, मृत्यूची संख्या 679 वर

जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाचे 756 नवीन रुग्ण आढळले असून, आतापर्यंत 679 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
3Corona_20Sakal_20times_2.jpg
3Corona_20Sakal_20times_2.jpg

नगर : जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाचे 756 नवीन रुग्ण आढळले असून, आतापर्यंत 679 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात काल ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३२ टक्के इतके झाले आहे. काल रूग्ण संख्येत ७५६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ५७० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १६०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३६ आणि अँटीजेन चाचणीत ३६० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, अकोले १७, जामखेड ८, कर्जत १,कोपरगाव २, नगर ग्रामीण १३, नेवासा ६, पारनेर १, पाथर्डी ७, शेवगाव ५, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ९, कॅंटोन्मेंट २ आणि मिलिटरी हॉस्पिटल ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २३६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८७, अकोले ४, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २४, नेवासा १५, पारनेर ०७, पाथर्डी ९, राहाता १८, राहुरी १९, संगमनेर २, शेवगाव २, श्रीगोंदा २, श्रीरामपूर ३२ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४१९ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा २६, अकोले १८, जामखेड २१, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण १८, नेवासा १६, पारनेर १७, पाथर्डी ३८, राहाता ३२, राहुरी ९, संगमनेर ५६, शेवगाव ३६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत बरे झालेली रुग्ण संख्या ३६ हजार १५७ झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 570 झाली आहे. आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 41 हजार 406 झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com