कोपरगावकरांच्या प्रेमात अभिनेता सिध्दार्थ जाधव ! केला गावचा फेरफटका - Actor Siddharth Jadhav in love with Kopargaon villagers! A tour of Kela village | Politics Marathi News - Sarkarnama

कोपरगावकरांच्या प्रेमात अभिनेता सिध्दार्थ जाधव ! केला गावचा फेरफटका

मनोज जोशी
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

शहरातील रस्त्यावर पायी फिरून आपले मित्र डॉ. मयूर तिरमुखे यांच्या घरी पाहुणचार घेऊन साई दर्शनाला गेला. त्यांच्या या अचानक भेटीने व सर्व सामान्यांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे शहरवासीयांना ते भावून गेले.

कोपरगाव : मराठी चित्रपट सृष्टीचा आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधव चक्क कोपरगावकारांच्या प्रेमात पडला असून, आपल्या जुन्या मैत्रीचे ऋणानुबंध त्यांनी या भेटीतून उजळून काढले.

शहरातील रस्त्यावर पायी फिरून आपले मित्र डॉ. मयूर तिरमुखे यांच्या घरी पाहुणचार घेऊन साई दर्शनाला गेला. त्यांच्या या अचानक भेटीने व सर्व सामान्यांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे शहरवासीयांना ते भावून गेले.

हेही वाचा... सुपे, हंगे प्रश्नावर लंके यांचा उपाय

ना गाड्यांचा ताफा ना सुरक्षेसाठी मोठी फौज. ना गाडीच्या काचा बंद आणि ठरलेल्या ठिकाणी गुपचुप जाणे, या सर्वाला अपवाद ठरला तो मराठीचा प्रसिद्ध अभिनेता सिध्दार्थ जाधव. डॉ. तिरमखे सोबत दोन वर्षा पुर्वी आम्ही एकत्र राहुन 'लग्न कल्लोळ' हा चित्रपट केला आहे. त्या चित्रपटाचे निर्माते डॉ. तिरमखे आहेत. कोपरगावात मी पहिल्यांदा आल्यासारखे वाटले नाही. रसिक मायबापांचा मी ऋणी आहे, त्यांनी मला भरभरुन प्रूम दिले, असे ते या वेळी म्हणाले.

शनिवारी दुपारी जाधव आपल्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी म्हणून सहज आले. शहरतील काही दुकानात त्यांनी खरेदी देखील केली. डॉ. मयुर तिरमखे यांच्या आई वडिलांना भेटण्यासाठी आलेला सिध्दुने शहरातील श्री लाईफ केअर हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली.

हेही वाचा.. ऊर्जामंत्री तनपुरेंच्या जिल्ह्यात शेतकरी संतप्त

दरम्यान, जाधव यांनी चला नाटक शिकु या येथे नाटकाचे धडे गिरवणाऱ्या कलाकरांशी संवाद साधुन अभिनयाशी निगडीत शंकाचे निरसन केले. कोपरगावच्या नाट्य चळवळीसाठी काम करणारे डॉ. मयुर तिरमखे, गणेश सपकाळ, सुधीर डागा यांचे त्यांनी विषेश अभिनंदन केले.

सुधीर डागा व माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शहरातील नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल माहित देवून नाट्य कलाकरांच्या समस्या जाधव यांच्या समोर मांडल्या.

अभिनेता जाधव यांच्या डॉ. मयुर तिरमखे, डॉ. योगेश लाडे, डॉ. संतोष तिरमखे, अमित तिरमखे, देविदास कानडे यांनी आदर सत्कार केल्याने जाधव भारावून गेले. अभिनेता जाधव यांच्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्या मोह आवरला नाही. सायंकाळी अभिनेता जाधव तालुक्यातील संवत्सर येथील तिरमखे यांच्या घरी भेट देवून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन करुन परतीचा प्रवास केला. 

दरम्यान, अभिनेता आल्यानंतर कोपरगावमध्ये त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली. सिद्धार्थनेही सर्वांना सेल्फीसाठी सहकार्य करीत साथ दिली. चित्रपटांमधून दिसणारा हा अभिनेता एकदम साधासुदा असल्याचे दिसून आले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख