नगरकडे येताना आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीला अपघात - Accident to MLA Prasad Lad's car on his way to town | Politics Marathi News - Sarkarnama

नगरकडे येताना आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीला अपघात

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील त्यांच्या नातेवाईकांकडे येण्यासाठी लाड नगरच्या दिशेने येत होते. या अपघातात गाडीतील सर्वजण सुखरुप आहेत.

नगर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. सुदैवाने ते सुखरूप असून, त्यांना कोणतीही इजा झालेली नसल्याचे त्यांनी सोशल मीडियावरून सांगितले आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील त्यांच्या नातेवाईकांकडे येण्यासाठी लाड नगरच्या दिशेने येत होते. कामशेत बोगद्यानंतर येणाऱ्या टोलनाक्याच्या आधी सुमारे एक किलोमीटरवर आमदार लाड यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील सर्वजण सुखरुप आहेत.

गणपतीबाप्पाच्या कृपेने सुखरूप

याबाबत लाड यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे, की अपघात झाला, ही बातमी खरी असून, गाडीचे नुकसान झाले आहेत. असे असले, तरी मी, पोलिस सहकारी, गाडीचालक, स्वीय सहाय्यक हे सर्वजण गणपतीबाप्पाच्या कृपेने सुखरूप आहेत. कोणीही काळजी करू नये. माझा नगरचा दाैरा पुढे करण्यासाठी मी पुढे जात आहे.

याबाबत त्यांच्या स्वीय सहाय्यकांशी संपर्क केला असता, आमदार व गाडीतील इतर सर्व व्यक्ती सुखरूप आहेत, असे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख