`बारामती पॅटर्न`ची खिल्ली उडवत प्रा. शिंदे यांच्याकडून रोहित पवार यांचा समाचार - About `Baramati pattern` Rohit Pawar's News from Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

`बारामती पॅटर्न`ची खिल्ली उडवत प्रा. शिंदे यांच्याकडून रोहित पवार यांचा समाचार

निलेश दिवटे
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत भाजपचीच सता येईल, असे ठासून त्यांनी सांगितले.

कर्जत : `बारामती पॅटर्न राबवू,` याबाबत जनतेची घोर निराशा झाली असून, कर्जतमधील विकासाची घोडदौड थांबली आहे. वर्षभराचा लेखाजोखा पाहता कर्जत- जामखेडमधील विकासाचे नवे पर्व अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केली.

कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत भाजपचीच सता येईल, असे ठासून त्यांनी सांगितले. आघाडी सरकार आणि विद्यमान आमदार रोहित पवार वर्ष सरले आहे. त्याबाबत भाष्य करण्यासाठी तालुक्याने काय कमावले, काय गमावले, या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, नगरसेविका राखी शहा, काका धांडे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, की एकवीस गावांचा सिंचन आणि पाणी पुरवठा योजनेसाठी अत्यंत महत्वाची असणारी तुकाई चारीचे कामास अडचण आणली गेली. तसेच अमरापूर-बिगवन आणि कोंभळी रस्त्याचे काम निकाला नंतर मंदावले. २५/१५ची अनेक कामे रद्द केली, आपण मंजूर करून आणलेल्या खेड-अगवन वस्ती, राशीन पाणीपुरवठा योजना, कुळधरण रस्ता कामाचे पुन्हा भूमिपूजन केले. हा कुठला प्रोटोकॉल आहे, महिला बचत गटाच्या माध्यमातून माध्यमातून स्वावलंबी व रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन हवेतच विरले. भ्रष्ट ठेकेदारावर कारवाई करू, तसेच त्यांना काळ्या यादीत टाकू, असे म्हणणारे विद्यमान लोकप्रतिनिधी नी त्यांनाच पुन्हा कामे दिली. याचा अर्थ त्यांनी केलेली तालुक्यातील मागील कामे दर्जेदार होती ?

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख