नगरमध्ये नव्याने 869 कोरोना बाधित, शहरात लाॅकडाऊनची मागणी - 869 new corona infested in town, demand for lockdown in city | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये नव्याने 869 कोरोना बाधित, शहरात लाॅकडाऊनची मागणी

मुरलीधर कराळे
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

जिल्ह्यातील राहुरी, जामखेड येथे लाॅकडाऊन केले असून, नगर शहरातही तातडीने लाॅकडाऊन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, काल रात्रीपपर्यंत 869 रुग्ण आढळले. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 26 हजार 482 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील राहुरी, जामखेड येथे लाॅकडाऊन केले असून, नगर शहरातही तातडीने लाॅकडाऊन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जिल्ह्यात काल ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ९५४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३२९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४६ आणि अँटीजेन चाचणीत २९४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६३, संगमनेर ४९, राहता ३, पाथर्डी ५, नगर ग्रामीण ३८, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट ७, नेवासे ५, श्रीगोंदा ४३, पारनेर ८, अकोले ३३, राहुरी ३२, कोपरगाव २६, जामखेड २, कर्जत ५  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २४६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११२, संगमनेर २०, राहाता २४,पाथर्डी १, नगर ग्रामीण १५, श्रीरामपुर २४, कॅंटोन्मेंट ४, नेवासा ६, श्रीगोंदा २, पारनेर १५, अकोले १, राहुरी १६, कोपरगांव २, जामखेड २ आणि कर्जत २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २९४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ८६, संगमनेर २३, राहाता २१, पाथर्डी ६, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट २, श्रीगोंदा १९, पारनेर १८, अकोले २७, राहुरी १, कोपरगाव ११, जामखेड १५ आणि कर्जत ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 22 हजार 150 झाली आहे. सध्या 3 हजार 954 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत 378 जणांचा मृत्यू झाला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख