कोरोना रुग्ण 50 हजारांच्या उंबरठ्यावर ! नव्याने आढळले 820 - 820 Corona patients on the threshold of 50 thousand! Newly discovered 820 | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना रुग्ण 50 हजारांच्या उंबरठ्यावर ! नव्याने आढळले 820

मुरलीधर कराळे
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे.

नगर : जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार १६७ रुग्णांची नोंद झाली असून, येत्या दोन दिवसांत हा आकडा 50 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. आज नव्याने 820 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 759 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिलशिला सुरूच आहे. 

जिल्ह्यात आज ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.२० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ५५० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत ३२९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, अकोले १८, जामखेड ६, कर्जत २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ९, नेवासा ५, पारनेर ७, पाथर्डी १४, राहाता ४, संगमनेर ३, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ३, मिलिटरी हॉस्पिटल १६, इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३६१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५५, अकोले ३५, जामखेड ६, कर्जत २, कोपरगाव ९, नगर ग्रामीण १७,, नेवासा १२, पारनेर ६, पाथर्डी ७, राहाता ३५, राहुरी २२, संगमनेर १३६,  शेवगाव ५, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३२९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ४३, अकोले १३, जामखेड २५, कर्जत २५,  कोपरगाव ७, नगर ग्रामीण ३, नेवासा १९, पारनेर १४, पाथर्डी ३८, राहाता २१, राहुरी ३७, संगमनेर २६, शेवगाव २२, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख