नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला, तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही त्या प्रमाणात वाढत आहे. सध्या एकूण 30 हजार 797 रुग्णसंख्या झाली असून, त्यापैकी 26 हजार 156 बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यातील रुग्णालयांत 4 हजार 164 रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज तब्बल ७१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आज दिवसभरात रूग्ण संख्येत ७८२ ने वाढ झाली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३६ आणि अँटीजेन चाचणीत २८३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका २३, संगमनेर १, राहाता २, पाथर्डी ५, नगर ग्रामीण २९, श्रीरामपूर १, कॅंटोन्मेंट २, नेवासे २०, श्रीगोंदा ११, पारनेर १४, शेवगाव २४, कोपरगाव २५ आणि जामखेड ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३३६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८४, संगमनेर ७,, राहाता ७६, पाथर्डी १५, नगर ग्रामीण २३, श्रीरामपुर १८, कॅंटोन्मेंट ०४, नेवासा १५, श्रीगोंदा ७, पारनेर ३२,अकोले २, राहुरी ४०, शेवगाव ५, कोपरगाव ६, जामखेड १ आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २८३ जण बाधित आढळून आले. यामध्ये,मनपा ४१, संगमनेर १, राहाता २७, पाथर्डी १५, श्रीरामपूर १, श्रीगोंदा ४१, पारनेर २८, अकोले ११, राहुरी ३०, शेवगाव १८, कोपरगाव २२, जामखेड २१ आणि कर्जत २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

