नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. प्रशासनाच्या वतीने उपायोजना करण्यात येत असल्या, तरी रुग्णांचा आकडा रोज वाढत आहे. आता सहाशेपेक्षाही जास्त रुग्ण आढळू लागल्याने नागरिकांमधून भितीचे वातावरण तयार होत आहे.
आज ६४७ रुग्णांची वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ४०८ इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 11 हजार 273 रुग्ण आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या आता १२४ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये महापालिका ४०, पाथर्डी ४, नगर तालुका २२, श्रीरामपूर १, कँटोन्मेंट १०, नेवासे १३, पारनेर १२, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव ५, जामखेड १, मिलिटरी हाॅस्पिटल १ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २४९ जण बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर ३१, राहाता २४, पाथर्डी २६, नगर शहर ३, श्रीरामपुर १०, कॅन्टोन्मेंट ३, नेवासे ६, श्रीगोंदा १५, पारनेर १०, अकोले ६, राहुरी १३, शेवगाव ३३, कोपरगाव १५, जामखेड २२ आणि कर्जत ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, महापालिका २३३, संगमनेर ८, राहाता २, नगर ग्रामीण १२, श्रीरामपुर ३, कॅन्टोन्मेंट ४, नेवासा २, पारनेर २, अकोले ३, राहुरी ४, शेवगाव २, जामखेड ७ आणि कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे. आज एकूण ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
नगर शहरात कोरोनाला आळा घालण्यासाठी वैदुवाडी व इतर परिसर सील करण्यात आला आहे. त्या भागात प्रशासनाच्या वतीने सुविधा पुरविल्या जात आहे.

