नगर जिल्ह्यात आज आढळले 559 कोरोना रुग्ण - 559 corona patients found in Nagar district today | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात आज आढळले 559 कोरोना रुग्ण

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

बरे झालेले एकूण रुग्ण ५ हजार ३३३ आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असलेले रूग्णांची संख्या ३ हजार १६५ झाली आहे. आतापर्य़ंत 96 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

नगर : जिल्ह्यात आज ५५९ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अँटीजेन चाचण्या वाढविल्याने रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त रुग्ण शोधून त्यांना बरे करण्याचे नियोजन प्रशासनाने घेतले असून, वाढत जात असलेली ही आकडेवारी नंतर कमी होईल, असा विश्वास प्रशासन व्यक्त करीत आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कोरोना टेस्ट लॅब २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खासगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार १६५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५ हजार ३३३  इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६२.०५ टक्के इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले. त्यामध्ये कोपरगाव १, नगर शहर ५, नगर तालुका ३, कॅन्टोन्मेंट ६, शेवगाव १, राहुरी १ , कर्जत १, नेवासा १, पारनेर २, श्रीगोंदे १ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३२१ जण बाधित आढळून आले. यामध्ये नगर शहर ५०, संगमनेर ३४,  राहाता १०, पाथर्डी ३१, नगर तालुका ११, श्रीरामपुर १०,  कॅन्टोन्मेंट १८,  नेवासे १९, श्रीगोंदा २३, पारनेर १२, अकोले ५, राहुरी ४, शेवगाव २४, कोपरगाव ३२, जामखेड ९ आणि कर्जत २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर शहर १६५, संगमनेर ११, राहाता २, पाथर्डी ५, नगर ग्रामीण ७, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट १, नेवासे ५, श्रीगोंदा ३, पारनेर २, अकोले ६, राहुरी १, कोपरगांव ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेले एकूण रुग्ण ५ हजार ३३३ आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असलेले रूग्णांची संख्या ३ हजार १६५ झाली आहे. आतापर्य़ंत 96 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत 8 हजार 594 रुग्ण आढळून आले आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख