भाजपकडून रायकर कुटुंबाला 5 लाख, प्रा. राम शिंदे धावले मदतीला - 5 lakh from BJP to Raikar family | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपकडून रायकर कुटुंबाला 5 लाख, प्रा. राम शिंदे धावले मदतीला

मुरलीधर कराळे
रविवार, 6 सप्टेंबर 2020

प्रा. शिंदे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली रायकर यांच्या कुटुंबियांना मदत व रायकर यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

नगर : श्रीगोंदे तालुक्यातील हंगेवाडी येथील पत्रकार (कै.) पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे पुणे येथे निधन झाले. रायकर यांना वेळेत व्हेंटलेटर न मिळाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी रायकर कुटुंबाची सांत्वनपर कुटुंबाची भेट घेऊन त्यांना भाजपच्या वतीने 5 लाख रुपयांचा धनादेश आज कुटुंबियांना दिला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन हा निधी रायकर कुटुंबियांना मिळवून दिला. प्रा. शिंदे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली रायकर यांच्या कुटुंबियांना मदत व रायकर यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत अधिवेशनात चर्चा करून संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 5 लाख रुपयांचा मदत देऊन शब्द पाळला. या प्रसंगी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे पत्रकाराचा जीव गेला आहे. याबाबत सरकार जबाबदार असून, संबंधित यंत्रणा व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. राम शिंदे यांनी केली. या वेळी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भाजप बाळासाहेब महाडिक आदी उपस्थित होते.

दरम्यान, रायकर यांचा मृत्यू हा शासकीय व्यवस्थेचा बळी ठरला आहे. कोरोनाच्या काळात सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. कोविड सेंटरमध्ये सुविधा नसताना रुग्णांना भरती केले जाते. त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो. याबाबत भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख