जिल्ह्यात आढळले 41 नवे रुग्ण, नगर तालुक्यात शिरकाव - 41 new patients found in the district, infiltration in Nagar taluka | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्ह्यात आढळले 41 नवे रुग्ण, नगर तालुक्यात शिरकाव

मुरलीधर कराळे
मंगळवार, 14 जुलै 2020

आजच्या अहवालात हिंगणगाव, रुई छत्तीशी, नागापूर येथील रुग्णांचा समावेश झाला आहे. ही गावे नगर शहरापासून जवळच असल्याने ही गावे आता बाधित झाली आहेत.

नगर : कोरोनाविषयक चाचणीच्या आज आलेल्या अहवालामध्ये 41 रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहरासह जिल्ह्यातील श्रोगोंदे, राहुरी, नगर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून नगर तालुक्यातील गावांमध्ये रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. 

नगर तालुक्यातील शेंडी, नागापूर, आदी गावांमध्ये यापूर्वीच रुग्ण सापडले होते. आजच्या अहवालात हिंगणगाव, रुई छत्तीशी, नागापूर येथील रुग्णांचा समावेश झाला आहे. ही गावे नगर शहरापासून जवळच असल्याने ही गावे आता बाधित झाली आहेत.

नगर महापालिका क्षेत्रातील ुकुंदनगर, गवळीवाडा, दिल्ली गेट, आंबेडकर चाैक, मंगल गेट, स्रमाट नगर, समता नगर, पाइपलाइन रोड, सिद्धार्थनगर, स्वास्थ्य हाॅस्टिल आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळून आले. शहराजळील भिंगार येथेही एक रुग्ण आढळून आला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एक रुग्ण आढळून आला असून, श्रीगोंदे तालुक्यातील चिंभळा आणि मांडवगण येथेही रुग्ण सापडले आहेत. 

सध्या जिल्ह्यात 384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्ण संख्या 1076 झाली असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 666 अशी आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नगर तालुक्यातील गावांमध्ये भितीचे सावट

नगर शहरात वाढते रुग्ण पाहता नगर तालुक्यातील गावांमध्ये भितीचे सावट आहे. शहराजवळील बहुतेक गावांतील शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. अनेकजण भाजीपाला विक्रीतून अर्थार्जन करतात. दूध, भाजीपाला हे नाशिवंत आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विक्री केल्याशिवाय पर्याय नाही. साहजिकच शेतकरी शक्य होईल तितकी काळजी घेवून विक्री करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोना खेडेगावात घुसण्याची भिती व्यक्त करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे बहुतेकजण पालन करीत नाहीत. ग्रामीण भागात तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, दुकानात गर्दी न करणे या नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये कोरोनाची सर्वाधिक भिती आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नगर तालुक्यातील गावांध्ये रुग्ण आढळून येत आहेत. शेंडी, हिंगणगाव, रुई छत्तीशी, डोंगरगण आदी गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे त्यांच्या मार्फत कोरोना इतर गावांमध्ये पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, काही ग्रामपंचायतींनी निर्णय घेवून गाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोखर्डी येथील मुख्य द्वाराजवळ आज पत्र ठोकले आहेत. बहुतेक गावांच्या सरपंचांकडून अधिकाऱ्यांशी, ग्रामस्थांशी चर्चा होत असून, गावे बंद करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख