कोरोना रुग्णांत झपाट्याने घट ! नव्याने आढळले 365 - 365 Rapid decline in corona patients! Newly discovered 365 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

कोरोना रुग्णांत झपाट्याने घट ! नव्याने आढळले 365

मुरलीधर कराळे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने घटू लागले असून, आज केवळ 365 रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोविड सेंटरमध्येही रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने घटू लागले असून, आज केवळ 365 रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोविड सेंटरमध्येही रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

नगर : जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. आता ३ हजार २९० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६३ आणि अँटीजेन चाचणीत २२१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, जामखेड ४, कर्जत ३, नगर ग्रामीण ३, नेवासे ८, पारनेर २, श्रीगोंदा २१, मिलिटरी हॉस्पिटल ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ६३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा ३०, अकोले १, जामखेड १, कोपरगाव १, नगर ग्रामीण २, नेवासे ५, पाथर्डी २, राहाता ५, राहुरी २, संगमनेर १, शेवगाव ६, श्रीगोंदे १, श्रीरामपूर ५, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २२१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २७, अकोले १०, जामखेड १९, कर्जत १९,  कोपरगाव १३,नगर ग्रामीण २, नेवासा १७, पारनेर १४, पाथर्डी २१, राहाता १३, राहुरी २, संगमनेर २८, शेवगाव १३, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 47 हजार 296 झाली आहे. सध्या 3 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 789 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्ण संख्या 51 हजार 275 झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख