नगर जिल्ह्यात 316 नवीन कोरोना रुग्ण, 340 जण डिस्चार्ज - 316 new corona patients, 340 discharged in Nagar district | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यात 316 नवीन कोरोना रुग्ण, 340 जण डिस्चार्ज

मुरलीधर कराळे
सोमवार, 27 जुलै 2020

जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होण्यासाठी कोविड सेंटर उभारले जात असून, त्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.

नगर : जिल्ह्यात आज दिलसभरात 316 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच 340 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1425 झाली आहे.

जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४२, अँटीजेन चाचणीत २५ आणि खासगी प्रयोगशाळेत १४९ रुग्णांचा समावेश आहे. आज  दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये  ९७ रुग्ण आढळले होते. त्यामध्ये श्रीगोंदे 8, अकोले 12, नगर शहर 14, नगर तालुका 5, राहुरी 4, पाथर्डी 1, शेवगाव 2, राहाता 1, संगमनेर 30, भिंगार 19, पारनेर 1 अशा रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर त्यामध्ये आणखी ४५ रुग्णांची वाढ झाली. यामध्ये पारनेर 2, वाळवणे 1, सुपे 1, नगर तालुक्यातील निंबळक, कामरगाव, रुईछत्तीसी, वाळुंज या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. राहाता तालुक्यातील सावळीविहीर 1, पुणतांबे 2 रुग्ण आढळून आले. पाथर्डी तालुक्यातील शंकरनगरमध्ये 1 रुग्ण आढळून आला.

नगर शहरातील पोलिस हेड काॅर्टरमध्ये 11 दातरंगे मळ्यात 1, सारसनगरमध्ये 3, कल्याण रोडवर 1, गुलमोहर रोडवर 2, कपिलेश्वर नगरमध्ये 1, मुकुंदनगरला 2, तारकपूर 1, सिव्हल हडको 1 तर पाइपलाइन रोडवर 5 रुग्ण आढळून आले. अँटीजेन चाचणीत आज राहाता येथील ४, पाथर्डी १४ आणि कोपरगाव येथील ७ जण असे एकूण २५ रुग्ण बाधित आढळले. 

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या रुग्णांमध्ये १४९ बाधित आढळले असून, त्यामध्ये नगर शहर ८७, नगर तालुका १७, नेवासे १, पारनेर ९, पाथर्डी २, राहाता ७, राहुरी ४, शेवगाव २, कॅन्टोन्मेंट रोड ३, संगमनेर ८, कोपरगाव ४ आणि श्रीरामपूर ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 1425 रुग्णांवर उपचार सुरू असून, 2285 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच मृृत्यूच्या संख्येत दोनने वाढ होऊन 53 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता 3763 रुग्ण झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होण्यासाठी कोविड सेंटर उभारले जात असून, त्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासनाबरोबरच राजकीय व्यक्ती प्रय़त्न करीत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख