नगरमध्ये बरे झाले 30 हजार! नव्याने वाढले 697 कोरोना रुग्ण - 30,000 cured in the city! Newly increased 697 corona patients | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये बरे झाले 30 हजार! नव्याने वाढले 697 कोरोना रुग्ण

मुरलीधर कराळे
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

जिल्ह्यात काल तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे.

नगर : जिल्ह्यात काल तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.१० टक्के इतके झाले आहे. काल दिवसभरात रूग्ण संख्येत ६९७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ७०७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१० आणि अँटीजेन चाचणीत ३५३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६८, संगमनेर ३, राहाता १, पाथर्डी ३, श्रीरामपूर ९, नेवासा ४, श्रीगोंदा ५, पारनेर ४, अकोले ७, राहुरी १७, कोपरगाव १, कर्जत १ आणि मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५७, संगमनेर १०, राहाता ३७, पाथर्डी ३, नगर ग्रामीण १६, श्रीरामपुर १०, कॅंटोन्मेंट ३, नेवासे ९, श्रीगोंदा ६, पारनेर १३, अकोले ३, राहुरी ३५, शेवगाव ५, कोपरगाव ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३५३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १९, संगमनेर १८, राहाता ३७, पाथर्डी २७, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर २०,  कॅंटोन्मेंट ४, नेवासा ५५,  श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले ४५, राहुरी २, शेवगाव ३२, कोपरगाव २९, जामखेड १८ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एक हजार ५१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २३५, संगमनेर ६६, राहाता १४२, पाथर्डी २९, नगर ग्रामीण ५५, श्रीरामपूर ७६, कॅन्टोन्मेंट ११, नेवासा ६७, श्रीगोंदा ३२, पारनेर ६२, अकोले ४७, राहुरी ८१, शेवगाव ३६, कोपरगाव ३७, जामखेड ३०, कर्जत ३७, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार 136 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 4 हजार 707 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 569 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 35 हजार 412 झाली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख