जिल्हा बॅंकेला पुन्हा 27 लाखांचा गंडा ! बनावट सोनेतारण प्रकरण - 27 lakh bribe to District Bank again! Fake goldfish case | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेला पुन्हा 27 लाखांचा गंडा ! बनावट सोनेतारण प्रकरण

विलास कुलकर्णी
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

सोनगावपाठोपाठ बॅंकेच्या तांभेरे शाखेतही बनावट सोनेतारण कर्जप्रकरणे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

राहुरी : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तांभेरे (ता. राहुरी) शाखेत एक सप्टेंबर 2019 ते एक जानेवारी 2020दरम्यान बनावट दागिने तारण ठेवून सोनेतारण कर्ज घेतलेल्या 20 जणांविरुद्ध 27 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी काल (मंगळवारी) राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

सोनगावपाठोपाठ बॅंकेच्या तांभेरे शाखेतही बनावट सोनेतारण कर्जप्रकरणे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा... नगरला बनवायचे नंबर वन

सोनगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला बॅंकेचा गोल्ड व्हॅल्यूअर अरुण नांगरे हाच तांभेरे येथील शाखेतही गोल्ड व्हॅल्यूअर होता. त्यानेच संगनमताने हा गैरप्रकार केल्याचे समोर आले. तांभेरे शाखेत 90 जणांना सोनेतारण कर्जवाटप केले होते. त्यांपैकी 37 जणांच्या सोन्याची सत्यता पडताळणी 28 व 30 डिसेंबर 2020 रोजी झाली. त्यांतील 33 जणांनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट आढळले.

हेही वाचा... चिमुरडीचा बापानेच केला खून

13 जणांनी बॅंकेचे कर्ज व व्याजाची काही रक्कम जमा केली. उर्वरित 20 जणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बॅंकेचे शाखाधिकारी भाऊसाहेब वर्पे (वय 59, रा. कोल्हार खुर्द) यांनी फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे तपास करीत आहेत. 

आरोपींची नावे 

प्रकाश गीताराम पठारे, पूजा नवनाथ पठारे, मंदाबाई गोपीनाथ पठारे, मनीषा राहुल पठारे, राहुल गोपीनाथ पठारे, नवनाथ गोपीनाथ पठारे, बाबासाहेब सखाहरी पठारे, राहुल शांताराम नालकर, अश्विनी बाळासाहेब पवार, रवींद्र बाळासाहेब पवार, संजय शंकर चिकणे (सर्व रा. लक्ष्मीवाडी, रामपूर) सुनील उत्तम सरोदे, अनिल उत्तम सरोदे (रा. तांदूळनेर), प्रवीण अरुण शिरडकर, माया राजेंद्र येळे (दोघेही रा. कोल्हार खुर्द), अरुण बाळासाहेब शिंदे (रा. रामपूर, हल्ली रा. पाथरे, ता. राहाता), शुभम अंबादास येळे (रा. कानडगाव, हल्ली रा. हनुमंतगाव, ता. राहाता), संदीप बाळासाहेब अनाप (रा. अनापवाडी, सोनगाव), पोपट काशिनाथ थोरात (रा. सात्रळ), गोरक्ष राधूजी जाधव (रा. माळेवाडी- डुक्रेवाडी). सर्व आरोपी पसार आहेत. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख