नगरमध्ये आढळले 161 कोरोना रुग्ण, गाठला 4 हजारांचा टप्पा - 161 corona patients found in the town, reached the stage of 4 thousand | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

नगरमध्ये आढळले 161 कोरोना रुग्ण, गाठला 4 हजारांचा टप्पा

मुरलीधर कराळे
मंगळवार, 28 जुलै 2020

शहरातील सारसनगर परिसरात रोज रुग्ण आढळत आहेत. त्याचप्रमाणे पोलिस हेड काॅर्टरमध्येही रुग्ण आढळत असल्याने पोलिसांना होत असलेली बाधा चिंताजनक बनली आहे. 

नगर : जिल्ह्यात आज नव्याने 161 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आज ३ हजार ९२४ रुग्ण झाले आहेत. उद्या मात्र 4 हजारांचा टप्पा पूर्ण होऊ शकेल, अशी शक्यता आहे. आज 133 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, 1452 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९०, अँटीजेन चाचणीत २६ आणि खासगी प्रयोगशाळेत 45 जण बाधीत आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत ५४ जण बाधित आढळून आले. यामध्ये नेवासे ११, संगमनेर ५, श्रीगोंदा १०, कोपरगाव ७, पाथर्डी १०,  नगर शहर ८, नगर ग्रामीण १, पारनेर १ अशा रुग्णांचा समावेश आहे. दुपारनंतर त्यामध्ये आणखी ३६ रुग्णांची भर पडली. त्यामध्ये  नगर शहर 4, पोलिस हेड काॅर्टर 2, चितळेरोड 1, सारसनगर 1 अशा रुग्णांची भर पडली.

संगमनेर तालुक्यात आज 24 रुग्ण आढळून आले असून, साईनाथ चौक १, आश्वी बुद्रुक ३, चंद्रशेखर चौक १, कुरण रोड २, खंडोबा गल्ली ३, पावबाकी रोड २, तहसील कचेरी १, निमगाव पागा ३, शेडगाव ३, इस्लामपूरा १, इंदिरानगर १, घुले वाडी १, जॉर्वे १, पद्मानगर १ असे रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यातील जांभळे येथे 1 रुग्ण आढळून आला. पाथर्डी तालुक्यात 1, श्रीगोंद्यात 1 असे रुग्ण आढळून आले आहे. अॅंटीजेन चाचणीत आज  २६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कँटोन्मेंट १, नगर ग्रामीण १, पाथर्डी ३, संगमनेर ६ आणि श्रीरामपूर १५ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, नगर शहर २५, जामखेड ३, कोपरगाव १, नगर तालुका २, पारनेर २ पाथर्डी ३, राहाता ५, राहुरी १, संगमनेर २ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, नगर शहरातील काही राजकीय नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील सारसनगर परिसरात रोज रुग्ण आढळत आहेत. त्याचप्रमाणे पोलिस हेड काॅर्टरमध्येही रुग्ण आढळत असल्याने पोलिसांना होत असलेली बाधा चिंताजनक बनली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख