नगरमध्ये 151 रुग्णांची भर, उद्या पालकमंत्री कोणता निर्णय घेणार - With 151 patients in the city, the Guardian Minister will decide tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

नगरमध्ये 151 रुग्णांची भर, उद्या पालकमंत्री कोणता निर्णय घेणार

मुरलीधर कराळे
गुरुवार, 23 जुलै 2020

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या (ता. 24) नगर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पालकमंत्र्यांनी जनता कर्फ्यूसारखे पर्याय करावेत, अशी मागणी नागरिकांमधून व विविध संघटनांमधून होत आहे.

नगर : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 151 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोज शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. उद्या पालकमंत्री जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. जनता कर्फ्यू किंवा इतर काही निर्णय ते घेणार का, याबाबत उद्या चर्चा होऊ शकते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या (ता. 24) नगर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून जनता कर्फ्यूसारखे पर्याय करावेत, अशी मागणी नागरिकांमधून व विविध संघटनांमधून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पालकमंत्री काय निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खासगी प्रयोगशाळेत एकूण 151 बाधित रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ८ जण बाधित आढळले, तर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ५३ रुग्णांची नोंद झाली आहे. 

नगर शहरात आज ८ रुग्ण आढळून आले असून, एचडीएफसी बँकेजवळ, केडगाव, बागडपट्टी, भवानीगर, प्रेमदान चाैक आदी ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. भिंगारमध्ये एकूण 26 रुग्ण आढळून आले असून, ब्राम्हणगल्ली 3, नेहरुचौक 3, माळीगल्ली 2, गवळीवाडा 4, कुंभारगल्ली 1, घासगल्ली 1, मोमिनगल्ली 1, विद्याकॉलनी 1, शुक्रवार बाजार 2, कॅंटॉनमेंट चाळ 1, सरपनगल्ली 3, पंचशिल नगर 1, काळेवाडी 1, आंबेडकर कॉलनी 1, भिंगार 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. नगर तालुक्यातील टाकळी खादगाव 1, बुऱ्हाणनगर 2, विळद 6, निंबळक 2 रुग्ण आढळले आहेत.

नेवासे तालुक्यातील नेवासे फाटा 1, सोनई येथे 2 रुग्ण आढळले आहेत. राहुरी तालुक्यात 7 रुग्णांची नोंद झाली असून, वरवंडी 2, वांबोरी 1, राहुरी 1, राहुरी बुद्रुक 1, देवळाली 1, कात्रड 1 अशा रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे आज 1 रुग्ण आढळला. अकोले तालुक्यातील पेंडशेत 1, धुमाळवाडी 1, बहिरवाडी 3, देवठाण 1 रुग्ण आढळले आहेत. पारनेर तालक्यातील कान्हुरपठा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.

शेवगाव तालु्क्यात 5, थाटे 3, शेवगाव 2 रुग्ण आढळून आहेत. कर्जतमधील राशीन येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी 1, बन पिंपरी 2, कोळगाव 3 रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील गोळगाव येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टांगे गल्ली, नरसाळी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द 1, जनतानगर 1, कासार दुमाला 9, पद्मानगर 1 येथे रुग्णांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आल्या 53 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 337 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूचा आकडा 50 वर गेला असून, जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 771 झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख