अबब ! आज आढळले 72, नगर जिल्ह्यात कोरोनारुग्ण 1035 - 1035 Found today 72, corona patients 1035 in the district | Politics Marathi News - Sarkarnama

अबब ! आज आढळले 72, नगर जिल्ह्यात कोरोनारुग्ण 1035

मुरलीधर कराळे
सोमवार, 13 जुलै 2020

आज तब्बल 72 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार पार केला असून, सध्याची संख्या 1035 अशी झाली आहे. आता बहुतेक सर्वच तालुक्यांत कोरोनारुग्ण आहेत.

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये रोजच 50 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. आज तब्बल 72 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार पार केला असून, सध्याची संख्या 1035 अशी झाली आहे. आता बहुतेक सर्वच तालुक्यांत कोरोनारुग्ण आहेत.

आज सकाळी आलेल्या अहवालात 23 रुग्ण पाॅझिटिव्ह होते. त्यातील नगर शहरात 15, श्रीगोंद्यात 7, पारनेरमध्ये 1 असे रुग्ण होते. रात्री उशिरा आलेल्या अहवालात मात्र 49 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये 6 पाॅझिटिव्ह आले. तर खासगी प्रयोगशाळेतील अहवालात 43 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 3 तर श्रीगोंदे येथील 3 रुग्णांचा समावेश आहे.

नगर शहरातील विनायकनगर 4, शाहुनगर 1, श्रीरामनगर 1, सुभेदार गल्ली 1, भवानीनगर 1, सावेडी 3, कावरे मळा 1, नगर शहर 5 असे एकूण 17 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. नगरच्या उपनगरातील पितळे काॅलनी येथे 1 रुग्ण आढळला आहे. पोखर्डी येथेही 1 रुग्ण आढलून आला आहे.

संगमेर तालुक्यातील घुलेवाडी, मालदाड रोड, भारत नगर, जनता नगर, निमोण, जोर्वे रोड, रहमद नगर, आरगडे गल्ली आदी ठिकाणी 11 रुग्ण आढळले. राहाता तालुक्यातील शिर्डी येथे 1, पिंपरी निर्मळ येथे 1, सोनगाव पठारे 1, कानकुरी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव 1, तामर खेडा 1, राहुरी शहर 1 असे एकूण 3 रुग्ण आढळले. श्रीगोंदे तालुक्यातील चिखली 1, श्रीगोंदा शहर 1 असे एकूण 2 रुग्ण आढळले आहेत.

श्रीरामपूरमधील ममदापूर येथे 1 रुग्ण आढळून आला असून, अकोले 1, भिंगार 1, पाथर्डीतील त्रिभुवनवाडी येथे 1 रुग्ण आढळला आहे.

सध्या जिल्ह्यात उपचार सुरू असलेले रुग्ण 360 आहेत. बरे झालेले रुग्ण 649 असून, एकूण 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता 1035 झाली आहे. 

दरम्यान, जामखेड तालुक्यात गुरुवारपासून जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर शहरातही तसा प्रस्ताव दाखल झाला आहे. प्रस्ताव मंजुर होताच गुरुवारपासून नगरमध्ये जनता कर्फ्यू सुरू होणार आहे. अकोले शहरात एक रुग्ण आढळून आल्याने उद्यापासून अकोले शहर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख